महाराष्ट्राच्या 29 महानगर पालिकांचा महासंग्राम, कोण-कोणासोबत ?, कोणाचा कुठे दबदबा ? एका क्लीकवर जाणा

येत्या १५ जानेवारीला राज्यातील २९ महानगर पालिकांसाठी मतदान होत आहे. या निवडणूकांत मुंबई महानगर पालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेच,मुंबईत चौरंगी निवडणूक होत आहे.या निकालातून राज्यातील साल २०२९ चे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्राच्या 29 महानगर पालिकांचा महासंग्राम, कोण-कोणासोबत ?, कोणाचा कुठे दबदबा ? एका क्लीकवर जाणा
BMC polls
| Updated on: Jan 13, 2026 | 10:39 PM

Maharashtra Local Body Elections 2026 : महाराष्ट्रात 29  महानगर पालिकेच्या निवडणूका राज्यातील भविष्यातील राजकारणाची नांदी ठरणार आहेत. या निवडणूकात शहर भागात कोणत्या पक्षांचा दबदबा आहे हे निश्चित होणार असून राजकारणातील नव्या आघाडी आणि युतीची देखील चुणूक पाहायला मिळणार आहे. गेली अनेक वर्षे काही महापालिकांमध्ये निवडणूक झालेली नाही. त्यामुळे येत्या 15 जानेवारीला 29 महानगर पालिकेत मतदान होणार आहे. आणि मतमोजणी दुसऱ्या दिवशी १६ जानेवारी रोजी होणार आहे.

बदललेले राजकारण, नवे मित्र

एकीकडे सत्ताधारी महायुती ( भाजपा–शिवसेना शिंदे गट–राष्ट्रवादी अजित पवार गट ) मैदानात आहेत. तर दुसरीकडे महाविकास बहुजन आघाडी ( काँग्रेस–शिवसेना उद्धव गट – राष्ट्रवादी शरद पवार गट ) असा विरोधी सामना असला तरी विविध मुंबई, ठाणे वगळता पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना या 14 महानगरपालिकांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी स्वंतत्र लढा देत आहेत. याशिवाय मनसे, AIMIM, वंचित बहुजन आघाडी आणि अनेक स्थानिक आघाड्या आहेत. मुंबईत काँग्रेस आणि वंचित एकत्र लढत आहेत.

मुंबई ते पुणे : मोठ्या महानगरातील स्थिती

मुंबई महानगरपालिका (BMC) : 227 नगरसेवकांच्या जागा असणारी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेतील लढाई सर्वात रंगतदार होणार आहे.

गेल्यावेळची सत्ता:  शिवसेना (अखंड ) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली

यावेळचे समीकरण

* महायुती: भाजपा + शिवसेना

* UBT–मनसे–NCP (शरद पवार)

* कांग्रेस–वंचित

मुंबईच्या निकालाचा संपूर्ण राज्याच्या राजकारणावर परिणाम

ठाणे आणि कल्याण-डोंबिवली :

ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. तर कल्याण-डोंबिवली येथे शिवसेना आणि भाजपाचा दबदबा आहे. यंदा उद्धव ठाकरे यांची UBT-राज ठाकरे यांची मनसे एकत्र आल्याने मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड:

पश्चिम महाराष्ट्राच्या या दोन्ही महानगर पालिका राष्ट्रवादीकडून सध्या भाजपाच्या ताब्यात गेल्या आहेत. पुण्यात भाजपाने सर्व १६५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी अजितदादा गटात मोठी टक्कर आहे.

विदर्भ आणि मराठवाड़ा : काँग्रेस, AIMIM आणि वंचितचा प्रभाव :

नागपुर : नागपूर महानगर पालिकेत १५१ जागा असून भाजपाचा पूर्वापार राज्य आहे. येथे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील चांगले उमेदवार देऊन आव्हान दिले आहे.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

येथे शिवसेनेचा पूर्वीपासून दबदबा राहिलेला आहे. परंतू आता शिवसेनेची दोन शकले झाली आहे. येथे AIMIM देखील एक मजबूत दावेदार आहे. भाजपा, शिवसेना (दोन्ही गट) आणि AIMIM यांच्या तिरंगी निवडणूक होणार आहे.

अकोला, अमरावती, लातूर

या शहरात वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि स्थानिक पक्ष भाजपासाठी मोठे आव्हान आहेत. अकोलामध्ये वंचितचा प्रभाव निर्णायक मानला जात आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि खान्देश

नाशिक, धुले, जळगाव आणि जालनात भाजपा मजबूत स्थितीत आहे., परंतू महाविकास आघाडी आणि स्थानिक पक्षांच्या आव्हानांमुळे ही लढाई आता एकतर्फी राहिलेली नाही. नाशिकात शिवसेना (UBT)–मनसे–काँग्रेस–NCP (SP) चा संयुक्त प्रयोग चर्चेत आहे.

मुस्लिम बहुल शहरांसाठी वेगळे समीकरण

मालेगाव, भिवंडी, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात AIMIM, समाजवादी पार्टी आणि स्थानिक आघाड्या सत्तेची चावी स्वत:च्या हातात ठेवतात. मालेगावात AIMIM सर्वात मोठी ताकद मानली जात आहे.

स्थानिक आघाडी आणि किंगमेकर राजकारण

कोल्हापुर, इचलकरंजी, अमरावती आणि अहिल्यानगरात स्थानिक विकास आघाड्या आणि अपक्ष गट सत्तेचे संतुलन निश्चित करतात. या जागांवर निवडणूकीच्या निकालानंतर स्थानिक आघाड्यांची राजकारण आणि वेगाने होण्याची शक्यता आहे.

भाजपा शहरातील महानगर पालिकेतील स्वत:चा दबदबा काय ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवसेना (UBT) मुंबई-ठाणे बेल्ट वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. काँग्रेस विदर्भ आणि मराठवाड्यात पुनरागमणाची आशा बाळगून आहे.
AIMIM आणि वंचित अनेक महानगरपालिकांत किंगमेकरची भूमिका निभा वठवू शकते.

2029 च्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक

29 महानगरपालिकांच्या निवडणूका स्थानिक सत्तेचा फैसला तर करतीलच परंतू येणाऱ्या २०२९ च्या राजकारणाची दिशा काय असणार हे निश्चित करणार आहेत. भाजपा शहरी भागातील आपल्या दबदबा कायम राखू शकेल का ? की महाविकास आघाडी पुनरागमन नवा संदेश देणार ? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील राजकारणाची दिशा ठरवणार आहेत.

1. मुंबई महानगरपालिका ( एकूण जागा – 227 )

गठबंधन– भाजपा + शिवसेना

भाजपा – 137 जागा (2 जागांवर नामांकन रद्द ), शिवसेना – 91 जागा

शिवसेना (UBT) + मनसे + राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार)

शिवसेना (UBT) – 163 जागा + मनसे – 53 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 11 जागा

काँग्रेस + वंचित (एकत्र )

कांग्रेस – 143 जागा, वंचित – 50 जागा, रासप – 5 जागा

राष्ट्रवादी काँग्रेस – 96 जागा

2. नवी मुंबई महानगरपालिका (एकूण जागा – 111)

भाजपा – 110 जागा

शिवसेना – 110 जागा

कांग्रेस – 16 जागा

राष्ट्रवादी काँग्रेस – 20 जागा

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) – 19 जागा

शिवसेना (UBT) + मनसे

शिवसेना (UBT) – 56 जागा

मनसे – 25 जागा

14 समर्थन असलेल अपक्ष उमेदवार

3. वसई–विरार महानगरपालिका ( एकूण जागा – 115)

भाजपा आणि शिवसेना ( एकत्र )

भाजपा – 81 जागा

शिवसेना – 27 जागा

बहुजन विकास आघाडी – 113 जागा

( मनसेचे 2 उमेदवार BVA च्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) बहुजन विकास आघाडीला समर्थन दिले आहे. )

काँग्रेस – 10 जागा

राष्ट्रवादी – 15 जागा

शिवसेना ( UBT ) – 85 जागा

4. कल्याण–डोंबिवली महानगरपालिका ( एकूण जागा – 122)

बिनविरोध विजयी – 20 जागा ( भाजपा – 14, शिंदे शिवसेना – 6)

शिवसेना आणि भाजपा महायुती

शिवसेना – 62 जागा, भाजपा – 40 जागा

शिवसेना (UBT) आणि मनसे आघाडी –

शिवसेना (UBT) – 53 जागा, मनसे – 35 जागा

राष्ट्रवादी – 39 जागा

कांग्रेस + वंचित + राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

कांग्रेस – 52

वंचित – 15

राष्ट्रवादी (शरद पवार) – 33

5. उल्हासनगर महानगरपालिका ( एकूण जागा – 78)

भाजपा – 78 जागा

शिवसेना + ओमी कलानी + साई पार्टी

शिवसेना + ओमी कलानी – 67 जागा

साई पार्टी – 11 जागा

शिवसेना (UBT) + मनसे + कांग्रेस

शिवसेना (UBT) – 44 जागा

मनसे – 14 जागा

कांग्रेस – 32 जागा

6. ठाणे महानगरपालिका (एकूण जागा – 131)

भाजपा + शिवसेना

भाजपा – 40 जागा

शिवसेना – 87 जागा

शिवसेना (UBT) + मनसे + राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार )

शिवसेना (UBT) – 62 जागा

मनसे – 28 जागा

राष्ट्रवादी ( शरद पवार ) – 41 जागा

काँग्रेस – 95 जागा

वंचित – 60 जागा

राष्ट्रवादी – 75 जागा

7. भिवंडी–निझामपुर महानगरपालिका ( एकूण जागा – 90)

बिनविरोध विजयी – 6 जागा

भाजपा + शिवसेना

भाजपा – 26

शिवसेना – 20

शिवसेना (UBT) + मनसे

शिवसेना (UBT) – 28

मनसे – 2

काँग्रेस – 58

समाजवादी पार्टी – 54

राष्ट्रवादी काँग्रेस – 24

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 37

AIMIM – 16

RPI (एकतावादी) – 8

पीस पार्टी – 2

कम्युनिस्ट पार्टी – 2

वंचित – 9

जय हिंद पार्टी – 5

आम आदमी पार्टी – 7

लोकहिंद पार्टी – 5

कोणार्क विकास आघाड़ी – 4

शहर विकास आघाड़ी – 4

8. पनवेल महानगरपालिका (एकूण जागा – 78)

महायुती

भाजपा – 71, शिवसेना – 4 ,राष्ट्रवादी काँग्रेस – 2, RPI ( आठवले गट ) – 1

महाविकास आघाडी

शेतकरी कामगार पक्ष – 33 शिवसेना (UBT) – 19 , राष्ट्रवादी ( शरद पवार ) – 7, काँग्रेस – 12, मनसे – 2, समाजवादी पार्टी – 1, वंचित – 1

9. मीरा–भाईंदर महानगरपालिका ( एकूण जागा – 95)

भाजपा – 88

शिवसेना – 81

काँग्रेस – 32

राष्ट्रवादी काँग्रेस – 33

राष्ट्रवादी (शरद पवार) – 14

शिवसेना (UBT) + मनसे

शिवसेना (UBT) – 56

मनसे – 11

10. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (एकूण जागा – 115)

भाजपा – 92

शिवसेना (UBT) – 95

शिवसेना – 96

कांग्रेस – 71

राष्ट्रवादी – 75

राष्ट्रवादी (शरद पवार) – 23

AIMIM – 47

वंचित – 61

11. कोल्हापूर महानगरपालिका ( एकूण जागा – 81 )

महायुती

भाजपा – 36 शिवसेना – 30 राष्ट्रवादी काँग्रेस – 15

महाविकास आघाडी

काँग्रेस – 75 ( मनसेचे काही उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर उभे )

शिवसेना (UBT) – 6

राजर्षी शाहू विकास आघाडी

राष्ट्रवादी (शरद पवार) – 23

आम आदमी पार्टी – 14

वंचित बहुजन आघाडी – 12

जनसुराज्य – 29

12. नागपुर महानगरपालिका ( एकूण जागा – 151 )

भाजपा + शिवसेना

भाजपा – 143, शिवसेना – 8

काँग्रेस – 151

राष्ट्रवादी – 96

शिवसेना (UBT) – 56

मनसे – 22

राष्ट्रवादी (शरद पवार) – 79

13. सोलापुर महानगरपालिका ( एकूण जागा – 102)

महाविकास आघाडी

काँग्रेस – 45 राष्ट्रवादी (शरद पवार) – 20 , शिवसेना (UBT) – 30, माकपा – 7

शिवसेना + राष्ट्रवादी

शिवसेना – 51

राष्ट्रवादी – 51

भाजपा – 102

14. अमरावती महानगरपालिका ( एकूण जागा – 87 )

काँग्रेस + शिवसेना (UBT)

काँग्रेस – 75

शिवसेना (UBT) – 12

राष्ट्रवादी ( शरद पवार ) – 14

राष्ट्रवादी – 87

भाजपा – 87

शिवसेना – 68

युवा स्वाभीमान पार्टी – 34

AIMIM – 25

15. अकोला महानगरपालिका ( एकूण जागा – 80)

भाजपा + राष्ट्रवादी काँग्रेस

भाजपा – 62

राष्ट्रवादी काँग्रेस – 14

शिवसेना – 73

महाविकास आघाडी

काँग्रेस – 49

राष्ट्रवादी (शरद पवार) – 24

शिवसेना (UBT) + मनसे

शिवसेना (UBT) – 55

मनसे – 9

वंचित – 53

रासप – 1

प्रहार – 1

AIMIM – 32

16. नाशिक महानगरपालिका ( एकूण जागा – 122 )

शिवसेना + राष्ट्रवादी

शिवसेना – 102

राष्ट्रवादी – 42

शिवसेना (UBT) + मनसे + राष्ट्रवादी (शरद पवार) + काँग्रेस

शिवसेना (UBT) – 79

कांग्रेस – 22

राष्ट्रवादी ( शरद पवार ) – 30

मनसे – 30

भाजपा – 118

वंचित – 55

17. पिंपरी–चिंचवड महानगरपालिका ( एकूण जागा – 128)

भाजपा + RPI

भाजपा – 123

RPI – 5

( भाजपाचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी )

राष्ट्रवादी काँग्रेस + राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार)

राष्ट्रवादी कांग्रेस – 118

राष्ट्रवादी (शरद पवार) – 11

( काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत )

शिवसेना – 57 उमेदवार, 3 पुरस्कृत

शिवसेना ( UBT ) – 50

कांग्रेस – 49

मनसे – 14

18. पुणे महानगरपालिका ( एकूण जागा – 165)

भाजपा – 165

शिवसेना – 125

काँग्रेस + मनसे + शिवसेना (UBT)

काँग्रेस – 98

मनसे – 125

राष्ट्रवादी काँग्रेस + राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार )

राष्ट्रवादी काँग्रेस – 122

राष्ट्रवादी ( शरद पवार ) – 43

19. चंद्रपूर महानगरपालिका ( एकूण जागा – 66)

भाजपा + शिवसेना

भाजपा – 58

शिवसेना – 8

राष्ट्रवादी – 40

काँग्रेस + जनविकास सेना

काँग्रेस – 63

जनविकास सेना – 3

मनसे – 25

शिवसेना (UBT) + वंचित

शिवसेना (UBT) – 33

वंचित – 33

राष्ट्रवादी ( शरद पवार ) – 55

20. परभणी महानगरपालिका ( एकूण जागा – 65)

राष्ट्रवादी काँग्रेस + राष्ट्रवादी (शरद पवार)

राष्ट्रवादी काँग्रेस – 57

राष्ट्रवादी (शरद पवार) – 8

काँग्रेस + शिवसेना (UBT)

काँग्रेस – 26

शिवसेना (UBT) – 39

भाजपा – 40

शिवसेना – 35

वंचित – 39

AIMIM – 18

यशवंत सेना – 18

मनसे – 3

21. लातूर महानगरपालिका ( एकूण जागा – 70)

भाजपा – 70

राष्ट्रवादी + रिपब्लिकन सेना

एकूण – 60 जागा

काँग्रेस + वंचित

काँग्रेस – 65

वंचित – 5

राष्ट्रवादी ( शरद पवार ) – 17

शिवसेना – 11

शिवसेना (UBT) – 9

AIMIM – 9

22. मालेगाव महानगरपालिका ( एकूण जागा – 84 )

भाजपा – 25

शिवसेना – 24

राष्ट्रवादी – 5

शिवसेना ( UBT ) + राष्ट्रवादी ( शरद पवार)

( मनसेचे समर्थन )

शिवसेना (UBT) – 11

राष्ट्रवादी ( शरद पवार ) – 12

काँग्रेस – 22

वंचित – 4

इस्लाम पार्टी + समाजवादी पार्टी

इस्लाम पार्टी – 47

समाजवादी पार्टी – 20

AIMIM – 57

23. नांदेड–वाघाळा महानगरपालिका ( एकूण जागा – 81 )

भाजपा – 70

काँग्रेस + वंचित

काँग्रेस – 58

वंचित – 14

शिवसेना

नांदेड उत्तर – 40 ( स्वतंत्र पण लढणार  )

नांदेड दक्षिण – 29 (राष्ट्रवादी सोबत आघाडी )

राष्ट्रवादी काँग्रेस – 63

AIMIM – 35

शिवसेना (UBT) – 39

24. सांगली–मिरज–कुपवाडा महानगरपालिका ( एकूण जागा – 78)

भाजपा – 78

शिवसेना – 65

राष्ट्रवादी – 33

काँग्रेस – 32

राष्ट्रवादी (शरद पवार) – 22

शिवसेना (UBT) – 32

मनसे – 6

25. जळगाव महानगरपालिका ( एकूण जागा – 75 )

महायुती

भाजपा – 46

शिवसेना – 23

राष्ट्रवादी – 6

शिवसेना ( UBT ) + राष्ट्रवादी (शरद पवार) + मनसे

शिवसेना (UBT) – 37

राष्ट्रवादी (शरद पवार) – 21

मनसे – 5

काँग्रेस + वंचित – 29

समाजवादी पार्टी – 8

आम आदमी पार्टी – 5

स्वराज्य शक्ति सेना – 12

AIMIM – 8

26. अहिल्यानगर महानगरपालिका ( एकूण जागा – 68 )

महाविकास आघाडी

शिवसेना (UBT) – 21

राष्ट्रवादी (शरद पवार) – 27

काँग्रेस – 13

भाजपा + राष्ट्रवादी काँग्रेस

भाजपा – 32

राष्ट्रवादी काँग्रेस – 32

शिवसेना – 40

AIMIM – 6

बसपा – 4

सपा – 5

वंचित – 3

मनसे – 6

27. धुळे महानगरपालिका ( एकूण जागा – 74 )

भाजपा – 58

शिवसेना + राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस – 39

शिवसेना – 29

काँग्रेस + शिवसेना ( UBT ) + राष्ट्रवादी ( शरद पवार ) + मनसे

काँग्रेस – 21

शिवसेना (UBT) – 29

राष्ट्रवादी (शरद पवार) – 19

मनसे – 4

AIMIM – 21

समाजवादी पार्टी – 7

बसपा – 5

वंचित बहुजन आघाडी – 3

जनता दल – 1

28. जालना महानगरपालिका ( एकूण जागा – 65 )

भाजपा – 65

शिवसेना – 63

कांग्रेस + शिवसेना ( UBT ) + राष्ट्रवादी ( शरद पवार )

कांग्रेस – 44 शिवसेना ( UBT ) – 12राष्ट्रवादी ( शरद पवार ) – 12

राष्ट्रवादी काँग्रेस + मनसे

राष्ट्रवादी काँग्रेस – 50 मनसे – 5

वंचित बहुजन आघाडी – 20

AIMIM – 34

रासप – 1

29. इचलकरंजी महानगरपालिका ( एकूण जागा – 65 )

महायुती ( राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यादरम्यान मैत्रीपूर्ण लढत )

भाजपा – 58

शिवसेना – 11

राष्ट्रवादी काँग्रेस – 12

शिवसेना (UBT) – 18

शिव शाहू विकास आघाडी – 65 जागा

(काँग्रेस + राष्ट्रवादी (शरद पवार) + मनसे + माकपा + अन्य पक्ष )