Wardha Crime | 17 वर्षीय मुलगी प्रियकरासोबत गेली, आई-वडिलांनी ताब्यात घेतले, तिथूनंही मुलीनं प्रियकरासोबत ठोकली धूम

मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरी जाऊन मुलीची समजूत काढली. अजून तुझे वय लहान आहे. वयात आल्यावर लग्न करा, असे समजावून मुलीला देववाडी येथून मुलाच्या घरातून ताब्यात घेतले. तिथूनही ती मुलासोबत दुचाकीवर बसून पळून गेली...

Wardha Crime | 17 वर्षीय मुलगी प्रियकरासोबत गेली, आई-वडिलांनी ताब्यात घेतले, तिथूनंही मुलीनं प्रियकरासोबत ठोकली धूम
ती मुलासोबत दुचाकीवर बसून पळून गेली...
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 29, 2022 | 10:48 AM

वर्धा : आई वडिलांनी आयुष्यभर झटून मुलाबाळांचे पालन पोषण केले. त्याचं आई वडिलांना झुगारुन मुलगी चक्क आई वडिलांना सोडण्यापर्यंत मजल गेली. असाच काहीसा प्रकार तळेगाव पोलीस (Talegaon police) ठाण्याच्या हद्दीतल पारडी (Pardi) फाट्याजवळ घडला. मुलगी प्रियकरासोबत गेली. तिथून आईवडिलांनी तिला ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीने पुन्हा त्यांच्याच समोर प्रियकराच्या दुचाकीवर बसून धूम ठोकली. घरच्यांनी याबाबतची तक्रार तळेगाव पोलिसात दाखल केली. पोलिसांनी मुलगी अल्पवयीन असल्याने प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा (kidnapping case) दाखल केलाय. पोलिसांसमोर प्रश्न पडला. मुलगी अल्पवयीन आहे. तरीही ती प्रियकरासोबत पळाली. तिला शोधण्याचं काम तळेगाव पोलिसांनी सुरू केलं.

वयात आल्यावर लग्न कर

सतरा वर्षीय मुलीचे अक्षय नामक मुलाशी प्रेम फुलले. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने घरच्यांनी त्यांच्या या नात्याला विरोध केला. मात्र, घरच्यांच्या विरोधाला झुगारुन मुलीने घरातून पळ काढला. थेट प्रियकरासोबत राहू लागली. याची माहिती मिळाली असता मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरी जाऊन मुलीची समजूत काढली. अजून तुझे वय लहान आहे. वयात आल्यावर लग्न करा, असे समजावून मुलीला देववाडी येथून मुलाच्या घरातून ताब्यात घेतली. पण, मुलगी काही मानावयास तयार नाही. तिला तिच्या प्रियकराचीच आठवण येते.

लघुशंकेच्या बहाण्याने उतरली नि प्रियकरासोबत पळाली

मुलीला घेऊन घरी जात असताना मुलीने पारडी फाट्याजवळ लघूशंकेचा बहाणा सांगून कार थांबवायला सांगितली. चालकाने कार थांबविली असता मुलगी कारखाली उतरली. काही वेळातच पारडी फाट्यावर मुलीचा प्रियकर अक्षय दुचाकीवर आला. मुलीने घरच्यांसमोरच मुलाच्या दुचाकीवर बसून धूम ठोकली. आई-वडील पाहतच राहिले. या मुलीला आता कसं समजवावं हे त्यांना कळेना.

सैराटची आठवण

सैराट चित्रपटात परशासोबत आर्ची पळून जाते. त्यानंतर तिचे आईवडील येतात. परत घेऊन जातात. पण, आर्ची परशासोबत पळून जाते. अशीच काहीशी ही स्टोरी आहे. यात मुलगी अल्पवयीन असल्यानं ती कायद्याच्या कचाट्यात सापडेल. मुलगाही नाहक पोलिसांची चक्की पिसेल. पण, या प्रेमवेढ्यांना समजवणार कोण?