श्रीकांत शिंदे यांची अवस्था कशी?, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं

| Updated on: Sep 23, 2022 | 3:50 PM

राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा फोटो ट्वीट केला. त्या फोटोत श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेले दिसत आहेत.

श्रीकांत शिंदे यांची अवस्था कशी?, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं
श्रीकांत शिंदे यांची अवस्था कशी?
Image Credit source: t v 9
Follow us on

महेश मुंजेवार, वर्धा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसून श्रीकांत शिंदे काम करत असल्याचा फोटो व्हायरल झालाय. या प्रकारावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडकून टीका केलीय. महाराष्ट्राचं नेतृत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंतदादा पाटील, यासारख्या महारथींनी केलं. त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर मुख्यमंत्र्याचा पोरगा बसतो. म्हणजे हे असं झालं की बाप नंबरी बेटा दस नंबरी, अशी बोचरी टीका मेहबूब शेख यांनी केली. वर्धेत शरद युवा संवाद यात्रेदरम्यान आले असताना त्यांनी पत्रकारांशी चर्चा केलीय.

उथळ पाण्याला खळखळाट फार

मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसून मुलानं काम करणं हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. उथळ पाण्याला खळखळाट अशी अवस्था श्रीकांत शिंदेची झाली आहे. म्हणजे मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांच्या अंगात घुसलं आहे की, श्रीकांत शिंदे यांच्या अंगात घुसलं आहे.

शिंदेंची गद्दारी पुत्रप्रेमापोटी

एकनाथ शिंदे यांनी जी गद्दारी केली तो निर्णय पुत्र प्रेमापोटी केल्याचं आता समोर यायला लागला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय भविष्यासाठी एकनाथ शिंदे अस्थिर होते, अशी दबक्या आवाजात चर्चा होती. कुठंतरी आज श्रीकांत शिंदेच्या देहबोली आणि वागण्यातून हे समोर येत आहे. असंही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण

राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा फोटो ट्वीट केला. त्या फोटोत श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेले दिसत आहेत.

श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, मी खासदार आहे. कुठं बसायचं, कुठं बसायचं नाही हे मला कळतं. हे ठिकाण घरच कार्यालय आहे. मी ज्या खुर्चीवर बसलो ती माझीच आहे. मात्र, मागे असलेला बोर्ड होता, याची मला कल्पना नव्हती.