Wardha raid | वर्ध्यातील खारडी-भारडी घाटावर खनिकर्म अधिकाऱ्याची धाड; तीन ट्रक, दोन बोट जप्त

सदर वाळूघाटावर कारवाईकरिता गेलेल्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात येथे यंत्रसामग्री आढळली. मात्र कारवाई नंतर जप्तीनाम्यान केवळ दोन बोट, तीन ट्रॅकच दाखविल्याचं सांगितलं जातंय.

Wardha raid | वर्ध्यातील खारडी-भारडी घाटावर खनिकर्म अधिकाऱ्याची धाड; तीन ट्रक, दोन बोट जप्त
खारडी-भारडी घाटावर खनिकर्म अधिकाऱ्याची धाड
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: May 01, 2022 | 1:07 PM

वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील वणानदीच्या पात्रावर असलेल्या खारडी-भारडी वाळू घाटावर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याने धडक दिली. यावेळी घाटातून तीन ट्रक व दोन बोटी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई जिल्हा खनिकर्म विभाग आणि हिंगणघाट तहसील (Hinganghat tehsil) कार्यालयाच्या वतीने संयुक्तरित्या करण्यात आली. या वाळूघाटावर अवैध उत्खनन होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना मिळाली. यावरून जिल्हाधिकारी यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी (District Mining Officer) यांना माहिती देत कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने या वाळूघाटावर धाड टाकत साहित्य जप्त करत कारवाई केली. पुढील कारवाईकरिता तहसीलदार (Tehsildar) यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या वाहनांवर किती दंड आकारला जातो याकडे लक्ष लागले आहे. या कारवाईमुळे आता इतरही घाटधारकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

कारवाईवर संशय

सदर वाळूघाटावर कारवाईकरिता गेलेल्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात येथे यंत्रसामग्री आढळली. मात्र कारवाई नंतर जप्तीनाम्यान केवळ दोन बोट, तीन ट्रॅकच दाखविल्याचं सांगितलं जातंय. यामुळे या कारवाईत आढळलेले साहित्य कोणाच्या दबावाखाली कमी दाखविण्यात आले, हे शोधण्याची गरज असल्याची चर्चा हिंगणघाटात आहे.

काही कर्मचाऱ्यांमुळ विभाग बदनाम

वर्धा जिल्ह्यातही वाळीघाटांवरून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होते. नुकतेच भंडारा जिल्ह्यात वाळूतस्करांनी एसडीओंवर हल्ला केला. पोलिसांनी मात्र बदमाशी केली. वाळूतस्करांसोबतच हातमिळवणी केली. अशा काही कर्मचाऱ्यांमुळं सारा विभाग बदनाम होतो. भंडाऱ्यातील हल्ला प्रकरणामुळं अधिकाऱ्यांना खूप जपून धाड टाकावी लागते. असं असलं, तरी वर्ध्यातील या कर्मचाऱ्यांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.