
राज्यात कडाक्याची थंडी वाढली आहे. उत्तरेकडून थंडी वारे येत असल्याने महाराष्ट्रात गारठा वाढलाय. अनेक शहरांमध्ये सरासरी पेक्षा 5 अंश सेल्सिअसणे किमान तापमानात घसरण झालीये. यासोबतच कमाल तापमानात घसरण होत असल्याने दुपारी वातावरणात गारवा आहे. नाशिक शहरात 9.7 अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात कडाक्याच्या थंडीचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. नोव्हेंबरची 21 तारीख असून थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, बिहार, राजस्थान, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या भागात पारा सातत्याने घसरताना दिसत आहे. हिम लाटेचा इशारा राज्यात असून पुढील दोन ते तीन दिवसात गारठा अधिक वाढणार आहे. अशातच शाळेचा वेळा उशिरा करण्याची मागणी पालकांकडून केली जातंय.
राज्यात गारठा वाढत असतानाच पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला. मध्य महाराष्ट्रात 21 ते 24 नोव्हेंबरदरम्यान कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या भागात पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतात. पाऊस कोसळल्यानंतर राज्यात थंडीचा कडाका असून वाढू शकतो, असा अंदाज आहे. मागील काही दिवसांपासून वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहेत.
धुळे येथे सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली. 6.5 अंश तापमान धुळ्यात नोंदवले गेले. निफाडमध्ये 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणीत 8.4 तापमानाची नोंद झाली. नाशिक, भंडारा, आहिल्यानगर येथे पारा खाली गेल्याचे बघायाला मिळाले. पुढील काही दिवसात राज्यात थंडीचा जोर वाढणार असल्याचे स्पष्ट आहे. मुंबईमध्येही सकाळच्या वेळी चांगलाच गारठा जाणवत आहे.
बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने अंदमान आणि निकोबार बेटांसाठी अलर्ट जारी केला आहे. 21 नोव्हेंबरपासून हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे समुद्राची परिस्थितीही खवळलेली असण्याची शक्यता आहे. मच्छिमारांना 23 नोव्हेंबरपर्यंत अंदमान समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. कुठे पाऊस, कुठे कडाक्याची थंडी तर कुठे थेट चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला. संपूर्ण देशात वेगवेगळे वातावरण सध्या बघायला मिळतंय.