Washim Crime | पती-पत्नीचा वाद, बाप मुले घेऊन आला; रेल्वेस्थानकावर चिमुकल्यांना सोडले, पोलिसांकडून वडिलांचा शोध

| Updated on: May 26, 2022 | 12:59 PM

बायकोशी भांडण झाले म्हणून त्यानं मुलांना रेल्वेस्ठेशनवर आणले. तिथं त्यांना खाऊ आणून देतो. तुम्ही इथंच थांबा, असं सांगितलं. मुलं थांबली पण बाप तिथून मुलांना वाऱ्यावर सोडून पळून गेला. थोड्या वेळानं मुलं रडायला लागली. एकीकडं त्यांच्या आईशी बापाचं झालेलं भांडण. दुसरीकडं बापानंही त्यांना वाऱ्यावर सोडलं.

Washim Crime | पती-पत्नीचा वाद, बाप मुले घेऊन आला; रेल्वेस्थानकावर चिमुकल्यांना सोडले, पोलिसांकडून वडिलांचा शोध
रेल्वेस्थानकावर बापाने चिमुकल्यांना सोडले
Image Credit source: t v 9
Follow us on

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे (Jaulka Railway) येथे निर्दयी बापानं चिमुकल्या दोन मुलांना वाऱ्यावर सोडले. सखाराम जाधव (Sakharam Jadhav) रा. धोत्रा जिल्हा हिंगोली येथील एका निर्दयी बापाचे नाव. उपाशी पोटी असलेल्या आपल्या पोटच्या दोन लहान चिमुकल्यांना मी तुमच्यासाठी काही तरी खायला घेऊन येतो म्हणून चक्क रेल्वेस्टेशनच्या प्लॅट फॉर्मवर सोडून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली. मालेगाव तालुक्यातील वरदरी (Vardari in Malegaon taluka) येथे सासरवाडी असलेला व्यक्ती आपल्या दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन आला. पत्नीसोबत भांडण करून पुणे येथून घरी धोत्रा आला. तेथून आज सकाळी पूर्णा अकोला पॅसेंजरने आपल्या दोन चिमुकल्यासह जऊळका रेल्वे स्टेशनवर उतरून आपल्या दोन्ही लहान मुलांना प्लॅटफॉर्मवर बसवले. लहान मुलांना खाऊ आणण्यासाठी जातो म्हणून निघून गेला. मात्र तब्बल 5 तास उलटून सुद्धा वडील न आल्याने लहान मुलांना अश्रू अनावर झाले.

5 तासातच वडिलांचा शोध

या घटनेची माहिती निर्भया पथकाला व गावातील पोलीस पाटील विजय सरोदे यांना मिळाली. रेल्वे स्टेशनवर दाखल होऊन मुलांची शहानिशा करून ताब्यात घेतले. उपाशी असलेल्या मुलांना पाणी व जेवण दिले. त्यानंतर माणुसकीला काळिमा फासणाऱ्या संभाव्य घटना टाळण्यास निर्भया पथकाच्या पोलीस महिला कर्मचारी शितल सरनाईक व पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे यांनी अवघ्या 5 तासातच वडिलांचा शोध घेतला. मुलांना वडील व मामांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रेरणादायी कार्याचे वाशिम पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांनी कौतुक केले. अशी माहिती पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे यांनी दिली.

बापाला नाही आली दया

दोन्ही मुले सहा ते आठ वर्षे वयोगटातील आहेत. बायकोशी भांडण झाले म्हणून त्यानं मुलांना रेल्वेस्ठेशनवर आणले. तिथं त्यांना खाऊ आणून देतो. तुम्ही इथंच थांबा, असं सांगितलं. मुलं थांबली पण बाप तिथून मुलांना वाऱ्यावर सोडून पळून गेला. थोड्या वेळानं मुलं रडायला लागली. एकीकडं त्यांच्या आईशी बापाचं झालेलं भांडण. दुसरीकडं बापानंही त्यांना वाऱ्यावर सोडलं. आता कुठं जावं, असा प्रश्न त्यांच्या मनात आला. काहीच सुचत नव्हतं. अशात पोलिसांनी मदत केली. दोन्ही मुलांना जवळ घेतले. त्यांच्या वडिलांचा शोध घेतला. पाच तासातच निर्दयी बाप सापडला. त्यानं शेवटी मुलांना घरी नेलं.

हे सुद्धा वाचा