AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत पाणी संकट… टँकर सेवा बंद होण्याची शक्यता, नागरिकांना पाणीटंचाईचा फटका

मुंबईत पाणीटंचाईचं सावट! टँकर व्यावसायिकांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळली असून, त्यांच्या संपामुळे मुंबईतील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत.

मुंबईत पाणी संकट... टँकर सेवा बंद होण्याची शक्यता, नागरिकांना पाणीटंचाईचा फटका
| Updated on: Jun 08, 2026 | 11:09 AM
Share

मुंबईत पाण्याचं संकट गडद असताना पाणीटंचाईचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमांच्या अंमलबजावणीमुळे टँकर व्यवसाय संकटात सापडला आहे.. त्यावरून टँकर व्यावसायिकांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळली असून त्यांच्या संपामुळे मुंबईतील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारच्या नवीन नियमाच्या निषेधार्थ मुंबईतील वॉटर टँकरचालक आणि मालकांची संप पुकारला आहे. संपाचा इमारत आणि इतर बांधकाम प्रकल्पांसह झोपडपट्ट्या आणि व्यावसायिक आस्थापनांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महापालिकेची रुग्णालये, अत्यावश्यक यंत्रणा तसेच अन्य विविध सेवांवर टँकरचालकांच्या संपाचा परिणाम होऊ शकतो

टँकर असोसिएशनच्या मूळ मागण्या

1. मुख्यमंत्री कार्यालयासोबत तातडीची बैठक आयोजित करावी.

2. CGWA (केंद्रीय भूजल प्राधिकरण) नियमांच्या अंमलबजावणीबाबत असोसिएशनची बाजू ऐकून घ्यावी.

3. स्थिती स्पष्ट होईपर्यंत BMC आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू असलेली कारवाई तात्पुरती स्थगित करावी.

4. टँकर चालक, विहीर मालक आणि पाणीपुरवठादारांवर जारी करण्यात आलेल्या नोटिसांबाबत पुनर्विचार करावा.

5. CGWA च्या काही नियमांमध्ये आणि प्रक्रियात्मक अटींमध्ये व्यवहार्य बदल करावेत, कारण त्या प्रत्यक्षात पूर्ण करणे कठीण असल्याचा त्यांचा दावा आहे.

6. विहीर मालकांच्या वीज जोडण्या तोडण्याची कारवाई थांबवावी.

7. खासगी पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा.

8. मागण्यांवर निर्णय होईपर्यंत टँकर व्यवसायावर होणारी प्रशासकीय कारवाई रोखावी.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांतील पाणीसाठा केवळ 40 दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. अशात मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनने रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून टँकर सेवा बंद ठेवण्याची घोषणा केलीये. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पाणीटंचाईचा फटका बसण्यास सुरुवात झालीये.

टँकर सेवा बंद झाल्याने मुंबईतील पाणी संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नव्या नियमांविरोधात टँकर चालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. जमिनीतील पाणी उपसा आणि परवानग्यांबाबतच्या नियमांमुळे अडचणी निर्माण झाल्याचा संघटनेने दावा केलाय. संघटनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलंय. मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईपर्यंत एकही खाजगी टँकर रस्त्यावर उतरवणार नसल्याचा त्यांनी इशारा दिलाय…

मुंबईतील हजारो गृहनिर्माण सोसायट्या टँकर पाण्यावर अवलंबून आहेत. अनेक हॉटेल्स, व्यावसायिक संकुले आणि उद्योगांनाही याचा फटका बसण्याची शक्यता. पालिकेच्या 10 टक्के कपातीनंतर टँकर बंद झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक, सोसायट्या आणि व्यावसायिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. आता सरकार, पालिका प्रशासन आणि टँकर संघटना यांच्यात नेमकी काय चर्चा होणार याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागलं आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात