AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supreme Court : नीट पेपर लीक प्रकरणात सुप्रीम कोर्टाने घेतली कठोर भूमिका, सरकारला दिले एकदम सूस्पष्ट निर्देश

Supreme Court : सध्या देशभरात नीट पेपर लीक प्रकरणावरुन गदारोळ सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने या विषयात कठोर भूमिका घेत काही महत्वाचे निर्देश दिले आहेत.

Supreme Court : नीट पेपर लीक प्रकरणात सुप्रीम कोर्टाने घेतली कठोर भूमिका, सरकारला दिले एकदम सूस्पष्ट निर्देश
Supreme Court
| Updated on: Jul 24, 2026 | 1:43 PM
Share

नीट यूजी पेपर लीक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणावर वर्षभर बारकाईने लक्ष ठेऊ असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला या विषयात विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रतिज्ञापत्रातून सरकारला, भविष्यात पेपर लीक सारख्या घटना रोखण्यासाठी काय व्यवस्था करणार, कोणती पावलं उचलणार? हे सांगावं लागेल.

केंद्र सरकारचं प्रतिज्ञापत्र आल्यानंतर ते विद्यमान स्थितीची समीक्षा करतील असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्याशिवाय वर्षभर आमचं या सर्व प्रकरणावर लक्ष असेल असं कोर्टाने म्हटलं आहे. वेळप्रसंगी फॉलो अप सुद्धा घेऊन. पेपर लीकचे प्रकार रोखण्यासाठी मजबूत आणि स्थायी व्यवस्था बनवावी, जेणेकरुन पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत, असं देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे.

केंद्र सरकारने सुद्धा आपली बाजू मांडली

सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने सुद्धा आपली बाजू मांडली. संपूर्ण प्रक्रिया विस्ताराने सांगू असं सरकारने कोर्टाला आश्वासन दिलं. पेपर छापण्याच्या जागेपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचवण्याच्या सर्व व्यवस्थेची सुप्रीम कोर्टाला माहिती देण्यात येईल.

काहीही कमतरता ठेवत नाहीय

आम्ही या प्रकरणात काहीही कमतरता ठेवत नाहीय. सर्व शक्य ते प्रयत्न करतोय असं केंद्र सरकारने म्हटलं. मुलांच्या समस्या गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असं सुद्धा सरकारने म्हटलं आहे. उच्च प्रशासकीय पातळीवर या सर्वावर लक्ष ठेवलं जातय.

लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी हा विषय खूप महत्वाचा

या संपूर्ण प्रकरणाशी निगडित असलेले लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी हा विषय खूप महत्वाचा आहे. कारण नीट यूजी परीक्षेचा थेट परिणाम त्यांच्या मेडिकल करिअरवर होतो. न्यायालय या विषयावर किती गंभीर आहे आणि पुढेही यावर बारीक लक्ष राहील हे सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरुन स्पष्ट झालं आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच