AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

monsoon update : या दिवसापासून महाराष्ट्रात धो-धो पाऊस, पंजाबराव डख यांचा 15 ते 30 जून पर्यंतच्या पावसाचा अंदाज

राज्यात मान्सून दाखल झाला आहे, मात्र अजूनही मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाहीये. येत्या 15 तारखेपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

monsoon update : या दिवसापासून महाराष्ट्रात धो-धो पाऊस, पंजाबराव डख यांचा 15 ते 30 जून पर्यंतच्या पावसाचा अंदाज
Weather expert Punjabrao Dakhs monsoon forecastImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 12, 2026 | 10:23 PM
Share

राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. मात्र तरी देखील संपूर्ण महाराष्ट्र अजूनही मान्सूनने व्यापलेला नाहीये. येत्या 15 जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सध्या स्थितीमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पाऊस सुरू आहे, तर काही भागांमध्ये अजूनही पाऊस झालाच नाहीये. शेतकऱ्यांचे डोळे मान्सूनच्या पावसाकडे लागले आहेत. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी पेरण्यांचा खोळंबा झाला आहे. दरम्यान पुढील 15 दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कसं असेल? कोणत्या भागांमध्ये पाऊस होईल याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

काय आहे डख यांचा अंदाज?

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे, परंतु तरी देखील अजूनही अनेक भागांमध्ये पाऊस झालेलाच नाहीये. मान्सूनच्या पावसाला ब्रेक लागल्याचं पहायला मिळत आहे. मात्र तेरा जूनपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. 13 जून ते 20 जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु या पावसाचं प्रमाण हे एक दिवसाआड असं राहील, म्हणजे एक दिवस पाऊस पडेल, दुसऱ्या दिवशी पाऊस पडणार नाही, असं या पावसाचं स्वरुप असेल, हा पाऊस विखुरला जाईल. असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की यंदा राज्यात तीन टप्प्यात पेरण्या होतील, पहिला टप्पा असेल एक ते सात जूनचा तर या काळात केजच्या पलिकडच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस चांगला झाल्यानं त्या भागात तसेच सातारा, सांगली जिल्ह्यातील काही भागांमध्ये पेरण्याला सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यात 20 जून ते 30 जून या दरम्यान एक दोन मोठे पाऊस होतील, त्यावेळी पेरणीचा दुसरा टप्पा होईल, राज्यात सामान्यपणे दरवर्षी मुंबईकडून पाऊस येतो, परंतु यावर्षी पावसाने दिशा बदलली आहे. या वर्षी काही पाऊस हा तेलंगणाकडून येईल, तर काही भागात पाऊस हा कर्नाटक राज्याच्या दिशेनं येईल, असंही यावेळी डख यांनी म्हटलं आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी