Weather Update : 15 राज्यात पावसाचा इशारा, आयएमडीचा हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबतही मोठी बातमी

यंदा संपूर्ण देशावर एल निनोचा प्रभाव पहायला मिळत आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसामध्ये मोठा खंड पडला आहे. परंतु आता पुन्हा एकदा देशात पावसासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती झाली असून, 15 राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Update : 15 राज्यात पावसाचा इशारा, आयएमडीचा हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबतही मोठी बातमी
IMD weather forecast
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 15, 2026 | 6:50 PM

यंदा संपूर्ण देशावर एल निनोचा प्रभाव पहायला मिळत आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसामध्ये मोठा खंड पडला आहे. सुरुवातीला जूनचा तिसरा आठवडा आणि संपूर्ण जुलै महिना देशासह राज्यात चांगला पाऊस झाला, परंतु त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून पावसात खंड पडला आहे. मान्सूनने दिलेल्या ओढीमुळे मोठं नुकसान झालं आहे. परंतु आता अचानक वातावरणात मोठा बदल पहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) कडून मोठा इशारा देण्यात आला आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे महाराष्ट्रासह तब्बल 15 राज्यांना हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू काश्मीर आणि उत्तर पाकिस्तानवर घोंघावत असलेली वाऱ्याची प्रणाली आता उत्तर पंजाबकडे सरकल्यामुळे याचं रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आता देशात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. संपूर्ण उत्तर भारतामध्ये तसेच महाराष्ट्रात यामुळे पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 16 ऑक्टोबर रोजी उत्तर, पश्चिम तसेच मध्य भारतामधील अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या काळात तापमान देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, गारठा वाढणार आहे. हवामान विभागाकडून दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, बिहार, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, जम्मू -काश्मीर, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Loading...

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये देखील हवामान बदलामुळे हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान पावसासोबतच विजांचा कडकडाट आणि वाऱ्यांचा वेग वाढणार असल्याने या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us