Nana Patekar : शेवटच्या दिवसांत गरीब मुलीच्या आयुष्याचं सोनं केलं; दोन दिवसांआधी दुष्काळावर नाना पाटेकर काय म्हणाले होते? ‘नाम’चे CEO नी नेमकं काय सांगितलं?

नाना पाटेकर यांच्या जाण्याने ग्रामीण भागातही शोेककळा पसरली आहे. गोव्यातून आल्यानतंर दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला जाणार होेते, असे नाम फाऊंडेशनचे सीईओ गणेश थोरात यांनी सांगितले.

Nana Patekar : शेवटच्या दिवसांत गरीब मुलीच्या आयुष्याचं सोनं केलं; दोन दिवसांआधी दुष्काळावर नाना पाटेकर काय म्हणाले होते? नामचे CEO नी नेमकं काय सांगितलं?
nana patekar
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 08, 2026 | 12:32 PM

हिंदी आणि मराठी सिनेमातील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या 7५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. नाना पाटेकर हे गोव्यात एका कार्यक्रमानिमित्त गेले असताना त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते अखेरच्या दिवसांतही गोरगरीबांच्या मदतीसाठी प्रयत्न करत होते. त्यांनी मागील काही वर्षांत नाम ‘फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत देऊ केली. नाना हे ‘नाम’ फाउंडेशनचे सीईओ गणेश थोरात यांच्या संपर्कात नेहमी असयाचे. दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये दुष्काळ दौरा आणि शेतकरी मदतीविषयी चर्चा झाली होती. नाना पाटेकरांच्या निधनानंतर ‘नाम’ फाउंडेशनचे सीईओ गणेश थोरात यांनी त्यांच्याविषयी महत्त्वाची माहिती दिली.

‘नाम’ फाऊंडेशनचे सीईओ गणेश थोरात म्हणाले, ‘ मी त्यांच्यासोबत काम केलं आहे. नाम फाउंडेशनबद्दल सर्वांना माहीत आहे. हे फाउंडेशन सर्वापर्यंत पोहोचवले. आज आमचं छत्र हरपलं आहे. ‘नाम’सारखं महाराष्ट्राचं छत्र हरपलं आहे. त्यांना महाराष्ट्र घडवायचा होता. भारताचे काही स्वप्ने पूर्ण करायची होती. आता दुष्काळाची परिस्थिती होती. तिथेही नाना हे शेतकऱ्यांना भेटायला जाणार होते. गणपती झाल्यानंतर आपण जाऊ. सर्व शेतकऱ्यांना आधार देऊ. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. त्यांना शासन आणि आपल्याकडून मदत देऊन संकटात मदत करण्याचा विचार होता. नाना पाटेकरांनी आमच्यासोबत बरोबर केलं नाही. ते न सांगता निघून गेले, बरोबर केलं नाही’.

Loading...

‘दोन दिवसांपूर्वी माझ्याशी बोलले. एका गरीब मुलीच्या शिक्षणासाठी फोन केला. तेही आम्ही पूर्ण केलं. फोन केल्यावर त्यांनी मदत केल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. नानांनी दुसऱ्यांना परकं मानलं नाही. शेतकरी हे कुटुंबातील आहेत. त्यांच्या मदतीला जायचं, हा विचार त्यांचा नेहमी असायचा. निनोमुळे परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावर खूप काम करावे लागेल. निधी तिकडे वळवावा लागेल. त्यांच्यासोबत मिळून आपण काय करायचं, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर नेहमी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बोलायचे. जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असायचे.  ‘नाम’ हा नानांचा विचार होता. जी अडचण होती, ती सोडवायची. माझी शेवटची भेट गणपतीत झाली. गणपती झाल्यानंतर गोव्यात गेले. गोव्यात असताना दोन कामानिमित्त बोलणे झालं. गोव्यात एका कार्यक्रमात गेले होते. त्यांचा व्हिडिओ व्हायरल होते. त्यानंतर ते महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगितले होते, असे गणेश थोरात पुढे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us