
मुंबई : लोकसभा निवडणुकीत कोणाचाही गेम करण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राच्या नेत्यांचा देशाच्या राजकारणावर वचक आहे. राज्याचे राजकारण इथल्या बड्या नेत्यांचा वक्तृत्वामुळे नेहमीच रंजक होत असते. पण, येथील ग्राउंड रिॲलिटी समजून घ्यायची असेल तर राजकारणाची एबीसीडीही जाणून घेतलीच पाहिजे. यामध्ये महाराष्ट्रातील किती जागांपासून किती पक्ष आहेत. कोणत्या जातींचे कोणते मुद्दे आहेत. या मूलभूत मुद्यांची माहिती घेतली तर लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्राचे राजकारण अधिक स्पष्टपणे दिसून येते. महाराष्ट्राचे राजकीयदृष्ट्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असे पाच भागात विभाजन करतात ते समजून घेऊ. पण, त्याआधी महाराष्ट्रात प्रमुख पक्ष कोणते? जातीय राजकारण कसे हे पाहू. महाराष्ट्रात पाच प्रमुख पक्ष महाराष्ट्रातील राजकारण हे भारतीय राजकारणावर प्रभाव टाकणारे राजकारण आहे. 15 मार्च 2019 रोजी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांची यादी जाहीर केली. यानुसार भारतामध्ये एकूण 2 हजार 334 राजकीय पक्ष आहेत. यापैकी 7 राष्ट्रीय पक्ष, 26...