AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ बातमीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, नेमके दावे काय? अजित पवार, 53 पैकी 40 आमदार, राज्यपालांना पत्र…

अजित पवार यांनी सोमवारचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले. ते सध्या मुंबईत आहेत. तेथून राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी बोलणं सुरु आहे, असा दावा करण्यात येतोय.

'त्या' बातमीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, नेमके दावे काय? अजित पवार, 53 पैकी 40 आमदार, राज्यपालांना पत्र...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 18, 2023 | 10:51 AM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची चिन्ह दिसतायत. ज्या नेते, आमदारांवर लक्ष आहे, ते फार बोलत नाहीयेत, मात्र काही नेते गेल्या काही दिवसांपासून सूचक संकेत देत आहेत. त्यातच आता द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रातील बातमीने राज्यभरात खळबळ माजवली आहे. अजित पवार एकाएकी पुण्यातले सगळे कार्यक्रम रद्द करून मुंबईत गेले. मुंबईत आपल्या विश्वासू व्यक्तींसोबत त्यांची खलबतं सुरु आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांना घेऊन अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा या वृत्तातून करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि या बातमीत करण्यात आलेले दावे, वर्तवण्यात आलेल्या शक्यता यांची पडताळणी सुरु आहे. या बातमीत नेमके काय मुद्दे आहेत, ते पाहुयात-

द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रातील बातमीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका विश्वासू सूत्राने दिलेल्या माहितीच्या हवाल्याने काही दावे करण्यात आलेत. ते पुढील प्रमाणे-

  • एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचे उत्तराधिकारी होण्यासाठी अजित पवार यांची तयारी सुरु झाल्याचा दावा याच वृत्तापत्रातून दोन दिवसांपूर्वीच्या बातमीत करण्यात आला होता. आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या गोटातील हालचालींना वेग आल्याचं सांगितलं जातंय.
  •  अजित पवार यांच्या या निर्णयासाठी पक्षातील महत्त्वाचे नेते आणि आमदारांच्या संमतीच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत.
  •  आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या आहेत.
  •  वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल, असे पक्षातील सूत्रांनी सांगितल्याचा दावा करण्यात आलाय.
  •  उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना सुप्रीम कोर्ट अपात्र ठरवेल, असे गृहित धरून शिदेंच्या जागी अजित पवार यांची वर्णी लागू शकते, असा दावा याच वृत्तपत्राने केला होता.

शरद पवारांचं सूचक मौन

या सगळ्या घडामोडींत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं खडखडीत मौन आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्या घेण्यासाठी त्यांना फोन करून बोलावत आहेत, मात्र मोठे पवार यावर काहीही बोलत नाहीयेत. २०१९ मध्ये अजित पवार यांची बंडखोरी दिसून आली तेव्हा शरद पवार यांनी पक्ष अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना बोलावून एकत्र राहण्याचं आवाहन केलं होतं. मात्र आजच्या घडीला शरद पवार यांचा अजूनही फोन आलेला नाही, याचं आश्चर्य वाटत असल्याचं राष्ट्रवादीच्या सूत्राने सांगितल्याचा दावा वृत्तातून करण्यात आलाय.

मुंबईत खलबतं.. निर्णय कधी?

अजित पवार यांनी सोमवारचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले. ते सध्या मुंबईत आहेत. तेथून राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी बोलणं सुरु आहे, असा दावा करण्यात येतोय. तर मुंबईत त्यांच्या विश्वासूंसोबत चर्चा सुरु असल्याचं म्हटलं जातंय. काल फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि अपक्ष आमदार रवी राणा यांनी दावा केलाय की, मोदी आणि शहांनी हिरवा कंदील दाखवला, तोच या घडामोडींचा टर्निंग पॉइंट ठरेल. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर किंवा कर्नाटक निवडणुकीपूर्वी हा स्फोट होण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच?

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच अजित पवारांच्या साथीने नवं सरकार स्थापन केलं जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. यासाठी कायदेशीर तर्कही वृत्तातून देण्यात आलाय. अजित पवारांनी निकालापूर्वीच शपथ घेतली तर नवीन सरकार पडणार नाही. किंवा भाजपच्या वर्चस्वाला धक्का पोहोचणार नाही. पडद्यामागे आणि पडद्यासमोर खूप काही घडतंय. आता फक्त अखेरच्या क्षणाची प्रतीक्षा आहे… असं भाजपातील एका सूत्राने सांगितल्याचा दावा या वृत्तातून करण्यात आलाय.

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.