छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता होता? वाचा…

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धे आणि दुरदर्शी राजे होते. त्यांनी मुघलांविरोधात लढा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. आज आपण त्यांनी जिंकलेल्या पहिल्या किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: Aug 27, 2025 | 5:57 PM
1 / 5
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19  फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वहिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाऊ होते.

2 / 5
माता जिजाई आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे बालपण गेले. त्यांनी बालपणात रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकल्या, तसेच शस्त्रे चालवण्याचे शिक्षण घेतले.

3 / 5
छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याच्यासोबत एक-एक मावळा जोडला गेला आणि शिवरायांनी स्वराज्य स्थापनेकडे पाऊल टाकले.

4 / 5
शिवरायांनी  जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला होता. 1647 मध्ये त्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता. या किल्ल्याला प्रचंडगड असेही म्हणतात. या विजयामुळे स्वराज्याचे तोरण बांधले गेले आणि मराठा साम्राज्याचा पाया रचला गेला.

5 / 5
त्यानंतर पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले जिंकले होते. यात पुरंदर, कोंढाणा (सिंहगड) आणि चाकण यांचा समावेश आहे. कालांतराने त्यांचे हे स्वराज्य आणखी वाढत गेले.