कोण आहेत IPS सोमय मुंडे; ज्यांनी गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांना ठार केलं, नक्षल चळवळीचं कंबरडं मोडलं?

| Updated on: Nov 15, 2021 | 10:22 PM

सोमय विनायक मुंडे हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मूळ रहिवासी आहेत. 31 वर्षे वयाच्या सोमय विनायक मुंडे यांचं लहानपणापासूनच आयपीएस अधिकारी व्हायचं स्वप्न होतं. सोमय मुंडे यांचे शिक्षण एमटेक, आयआयटीमध्ये झालेय. सोमय मुंडे यांचे शालेय शिक्षण हे देगलूर येथील साधना हायस्कूलमध्ये झाले.

कोण आहेत IPS सोमय मुंडे; ज्यांनी गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांना ठार केलं, नक्षल चळवळीचं कंबरडं मोडलं?
Follow us on

नांदेडः गडचिरोली जिल्ह्यातील मरदीन टोला परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलंय. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून नक्षली चळवळीत सक्रिय असलेला मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे देखील ठार झालाय. त्यामुळे सगळीकडेच याची चर्चा आहे. पण पडद्यामागे हे ऑपरेशन लीड करणाऱ्या एका अधिकाऱ्यांचं यात मोठं योगदान आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी आणि एका डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा असलेल्या IPS अधिकारी सोमय मुंडे यांनी तब्बल नऊ तास नक्षलवाद्यांशी झुंज देत ही मोहीम फत्ते करून दाखवली. पण हे सोमय मुंडे नेमके कोण आहेत ते जाणून घेणार आहोत.

कोण आहेत सोमय मुंडे?

सोमय विनायक मुंडे हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मूळ रहिवासी आहेत. 31 वर्षे वयाच्या सोमय विनायक मुंडे यांचं लहानपणापासूनच आयपीएस अधिकारी व्हायचं स्वप्न होतं. सोमय मुंडे यांचे शिक्षण एमटेक, आयआयटीमध्ये झालेय. सोमय मुंडे यांचे शालेय शिक्षण हे देगलूर येथील साधना हायस्कूलमध्ये झाले. तर माध्यमिक शिक्षण सातारा सैनिकी शाळा आणि राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज डेहराडून या ठिकाणी झालंय. सोमय यांनी आयआयटी आणि एमटेक ही पदवी संपादन केलेली असून, सोमय हे केंद्रीय लोकसेवा आयोगाची 2016 ची परीक्षा पास होऊन IPS अधिकारी झालेत.

डॉ. मुक्ता विनायक मुंडे आणि डॉ. विनायक चंद्रसेन मुंडे यांचे चिरंजीव

आयपीएस अधिकारी सोमय मुंडे हे देगलूर येथील डॉक्टर दाम्पत्य डॉ. मुक्ता विनायक मुंडे आणि डॉ. विनायक चंद्रसेन मुंडे यांचे चिरंजीव आहेत. वडील विनायक मुंडे मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील सनगाव येथील मूळ रहिवाशी असून, गेल्या 40 वर्षांपासून देगलूर येथे स्थायिक आहेत. डॉ. विनायक मुंडे हे जनरल सर्जन तर आई डॉ. मुक्ता ह्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. त्यांना दोन मुले असून, सोमय हे थोरले असून मुलगी सुमंता ह्या कॉम्प्युटर सायन्स करतायेत.

पहिली पोस्टिंग ही औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या ठिकाणी

सोमय विनायक मुंडे यांची पहिली पोस्टिंग ही औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या ठिकाणी झाली. त्यानंतर ASP अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे आणि आता गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी येथे ऍडिसनल एसपी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या अगोदर अनेक धाडसी कार्यवाही केल्यात. ज्यात मार्च 2021 छत्तीसगड परिसरातील अबुजमाळ येथे नक्षली परिसरात जाऊन त्यांचा अड्डा उद्ध्वस्त करत एन्काऊंटर कार्यवाही करून शस्त्र हस्तगत केले होते. तर जून 2021 रोजी गडचिरोली येथील अटापल्ली येथे धाडसी कार्यवाही करत 13 नक्षलींना कंठस्नास घातले होते.

संबंधित बातम्या

नागपुरात नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेचे होते वास्तव्य, पोलिसांची संबंधितांवर नजर

Video खुशखबर! शंकरपटांना पुन्हा सुरुवात होणार, सुनील केदार यांची माहिती