ती डिफेंडर कार कोणाची? अखेर संजय जाधव यांचा मोठा खुलासा, म्हणाले आम्ही काही केलं तर ते कोणाला देखवत नाही…

संजय जाधव सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. संजय जाधव यांनी आणलेल्या डिफेंडर कारची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, यावर प्रतिक्रिया देताना आता जाधव यांनी मोठा खुलासा केला आहे.

ती डिफेंडर कार कोणाची? अखेर संजय जाधव यांचा मोठा खुलासा, म्हणाले आम्ही काही केलं तर ते कोणाला देखवत नाही...
Sanjay Jadhav
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 23, 2026 | 11:30 AM

काही दिवसांपूर्वीच परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या आणखी पाच खासदारांनी सुद्धा शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश झाला होता. दरम्यान संजय जाधव सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. संजय जाधव यांनी आणलेल्या डिफेंडर कारची सध्या त्यांच्या मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान डिफेंडर कारची चर्चा सुरू झाल्यानंतर संजय जाधव यांनी अखेर पत्रकार परिषद घेऊन या कारबाबत मोठा खुलासा केला आहे, ही कार आपली नसून माझ्या मित्राची आहे, असा खुलासा या डिफेंडरबाबत संजय जाधव यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे, तसेच यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या इतरही प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

नेमकं काय म्हणाले संजय जाधव?

सध्या परभणी लोकसभा मतदारसंघात खासदार संजय जाधव यांनी आणलेल्या डिफेंडर कारची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेत आता या कारबाबत मोठा खुलासा केला आहे. ही डिफेंडर कार माझी नाही, माझ्या मित्राची आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथील प्राईड मिशन कार्यक्रमात जाण्यासाठी शाम गंभीरे नावाच्या माझ्या मित्राने मला ही कार दिली, असा खुलासा यावेळी संजय जाधव यांनी केला आहे. तसेच आम्ही काही केलं तर कोणाला देखवत नाही, असंही यावेळी संजय जाधव यांनी म्हटलं आहे.

मी मुंबईत होतो, छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राइड मिशनचा माझा कार्यक्रम होता, राज्यपाल आणि आम्ही सर्वजण त्या कार्यक्रमाला जाणार होतो, तेव्हा माझा मित्र शाम गंभीरे याने मला ही कार दिली, परंतु माझ्याकडे ही कार पाहून सर्वांनी अशी चर्चा सुरू केली की ही कार माझीच आहे, परंतु तसं काही नाहीये, ही कार माझी नाही, ही कार माझा मित्र शाम गंभीरे यांची आहे, असा खुलासा यावेळी संजय जाधव यांनी केला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us