शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंना मोठा झटका, शिंदे गटाच्या वकीलाचा कोर्टात सर्वात मोठा दावा, त्या एका दाव्यामुळे प्रकरणात ट्विस्ट

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून यापूर्वीच आपली बाजू मांडण्यात आली आहे. आता शिवसेना शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू आहे.

शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंना मोठा झटका, शिंदे गटाच्या वकीलाचा कोर्टात सर्वात मोठा दावा, त्या एका दाव्यामुळे प्रकरणात ट्विस्ट
शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 07, 2026 | 3:54 PM

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून यापूर्वीच आपली बाजू मांडण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला होता. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज कौल हे युक्तीवाद करत आहेत. सुप्रीम कोर्टात शिंदे गटाची बाजू मांडताना कौल यांच्याकडून आता मोठा दावा करण्यात आला आहे.

नेमंक काय म्हणाले नीरज कैल? 

Loading...

2018 मध्ये पक्ष घटनेत बदल करण्यात आला होता आणि ते निवडणूक आयोगाला कळवण्यात आलं होतं, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला होता. परंतु त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी कपिल सिब्बल यांचा हा दावा खोडून काढला आहे. 2011 मध्ये निवडणूक आयोगाला शिवसेनेची शेवटची पक्ष घटना देण्यात आली होती, असा युक्तीवाद यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात आला नाही, असंही कौल यांनी म्हटलं आहे.

यापूर्वीही काही घटनांमध्ये आमदारांचं पद आणि अधिकार कायम राहिले आहेत, असा दाखलाही यावेळी कौल यांनी  दिला आहे.प्रत्येक पक्षात अंतर्गत निवडणुका झाल्या पाहिजेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान या दाव्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेमध्ये उभी फूट पडली,  अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला, त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. त्यामुळे आता शिवसेनेचं पक्ष चिन्ह कोणाला द्यायचं असा प्रश्न निवडणूक आयोगासमोर होता, त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं चिन्ह शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला शिवसेना ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us