अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार, म्हणाल्या, त्यांनी पिंपरी चिंचवडसाठी..
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पिंपरी चिंचवड दाैऱ्यावर आहेत. यादरम्यानच त्यांनी अजित पवार यांच्या आठवणीला उजाळा दिला. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड या कामगार नगरीचा मोठा विकास केला. त्यांनी या शहराला नवसंजीवनी दिली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पिंपरी चिंचवडच्या दाैऱ्यावर आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांनी विकास घडवण्याचे काम केले. त्यातच आता सुनेत्रा पवार यांच्याकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. सुनेत्रा पवार यांनी बोलताना म्हटले की, अजित दादांनी पिंपरी- चिंचवड शहरासाठी मोठे कष्ट घेतले. या शहराचा उल्लेख केल्यास दादांच्या योगदानाची आठवण होतेच. हे शहर मोठ्या झपाट्याने वाढत आहे. नागरी सुविधांची गरजा आव्हान असणार आहे. कचऱ्याची समस्या आहे. अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम याविषयी चर्चा झाली. बैठक झाल्या. मोशी कचरा डेपोच पूर्ण काम झालं आहे. याविषयी लवकरच भेट देणार आहे. कचऱ्याची काय अवस्था आहे. हे बघणार आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करणार आहोत, असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले. पुढे बोलताना सुनेत्रा पवार यांनी म्हटले की, राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. मराठवाड्यात भयावह दुष्काळ परिस्थती आहे. तेथील स्थलांतरित होणाऱ्या लोकांचा विचार करणार आहोत. पिंपरी- चिंचवड हे अजित दादांच्या स्वप्नातील हे शहर आहे. मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन काम करूयात.
काही दिवसांपूर्वी पुणे, मुंबईत पाणी प्रश्नावर बैठक झाली. टाटा धरणातून पाणी आणण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री यावर निर्णय घेणार आहे. मावळ पवना जल बंद वाहिणीबाबत ही सकारात्मक चर्चा झालेली आहे. अजित पवार यांचा मोठा चाहतावर्ग पिंपरी चिंचवडमध्ये आहे. पिंपरी चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला होता. त्यानंतर अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला भाजपाने सुरंग लावला.
अजित पवार यांचे महत्वाचे नेते भाजपाने फोडले. हेच नाही तर महापालिकेची सत्ता आपल्या हातात भाजपाने घेतली. पक्ष वेगळी झाली असतील तर अजित पवार यांना मानणारा मोठा गट आजही पिंपरी चिंचवडमध्ये आहे. अजित पवार गटाची एक मोठी वचक पिंपरी चिंचवडमध्ये बघायला मिळते. योगेश बहल हे अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे नेते आहेत. काही लोक शरद पवारांच्या पक्षातही गेली.
