AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alcohol And Facts : देशी दारूचा नाद का सुटत नाही, संसार उद्ध्वस्त होतो तरी एक पेग का लगतो?

गरीब, शिक्षण नसलेल्या तसेच कष्टकरी वर्गामध्ये गावठी, हलक्या दर्जाची दारू पिण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. गावठी आणि हलकी दर्जाची दारू अगदी स्वस्त असते. 50 ते 100 रुपयांमध्ये दारू मिळत असल्याने लोक अशा प्रकारच्या नशेकडे लवकर आकर्षित होतात.

Alcohol And Facts : देशी दारूचा नाद का सुटत नाही, संसार उद्ध्वस्त होतो तरी एक पेग का लगतो?
desi daru and alcoholismImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 01, 2026 | 5:05 PM
Share

Alcohol Drinking Habbits : मद्यप्राशन हे आरोग्यास हानिकारक आहे. पण तरीदेखील रोज कोट्यवधी लोक थाटात दारू पितात. दारुचे व्यसन जडल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. परंतु तरीदेखील मद्यपान करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. उलट आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे मद्य पिणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. महिलांमध्येही दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे. आजकाल लोक महागडी दारू पितात. परंतु काही लोक तर अगदी स्वस्त आणि निकृष्ट दर्जाच्या मद्याच्याही आहारी जातात. परिमाणी त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. म्हणूनच निकृष्ट आणि स्वस्त दारुचा एकदा नाद लागला की तो का सुटत नाही. शरीरासोबत नेमकं काय घडतं? ते जाणून घेऊ या..

देशी आणि गावठी दारू प्यायल्याने काय होते?

खरं म्हणजे कोणतेही मद्य पिणे हे आरोग्यासाठी हानिकारकच असते. अति मद्यपानामुळे यकृतावर परिणाम होतो. त्यानंतर भविष्यात यकृत निकामी होऊन त्यामुळे मृत्यू होण्याचीही शक्यता असते. पण तरीदेखील लोक रोज दारू पितात. गरीब, शिक्षण नसलेल्या तसेच कष्टकरी वर्गामध्ये गावठी, हलक्या दर्जाची दारू पिण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. गावठी आणि हलकी दर्जाची दारू अगदी स्वस्त असते. 50 ते 100 रुपयांमध्ये दारू मिळत असल्याने लोक अशा प्रकारच्या नशेकडे लवकर आकर्षित होतात. एकदा डोकं झिंगल्यामुळे तसेच दारुची नशा चढल्याने दिवसभराचा थकवा जाणवत नाही. वेगवेगळ्या ताणतणावापासून मुक्तता मिळाल्याचा भास त्या काळात होतो. म्हणूनच लोक अशा प्रकारची स्वस्त दारु पितात.

कितीही प्रयत्न केला तरी गावठी दारुचा नाद का सुटत नाही?

गावठी, स्वस्त आणि निकृष्ट दर्जाची दारु पिणारे हे कष्टकरी, गरीब लोक असतात. ताणतणावात असल्याने, आर्थिक तंगी असल्याने रागात, चीडून अशी दारू पिली जाते. त्यामुळे या दारुचे व्यसन वाढतच जाते. मित्रांची संगत, आजूबाजूचे वातावरण यामुळेही मद्यपानाची सवय मोडत नाही. गावठी दारुमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशी दारू मज्जासंस्थेवर लवकर परिणाम करते. परिणामी आणखी दारु हवी असा संदेश शरीराला सतत मिळत राहतो. यातूनच नंतर दारुचे व्यसन वाढत जाते.

(टीप- मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था