AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिंदे आपला तो शब्द खरा करणार? भाजपला सर्वात मोठा धक्का, महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय?

आज विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, आता महायुतीच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! शिंदे आपला तो शब्द खरा करणार? भाजपला सर्वात मोठा धक्का, महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय?
MahayutiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 01, 2026 | 4:35 PM
Share

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीमध्ये मोठी बंडखोरी उफाळून आल्याचं पहायला मिळत आहे. भाजपाचं 17 पैकी 14 मतदार संघात संख्याबळ अधिक असल्यानं महायुतीमध्ये जागा वाटपाचं गणित नेमकं कसं असणार? कोणाच्या वाट्याला किती जागा येणार? भाजपला किती जागा मिळणार? राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. ही उत्सुकता अगदी शेवटपर्यंत कायम होती. शेवटी रविवारी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला. ज्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला 4 जागा मिळाल्या अजित पवार गटाला 2 तर भाजपला सर्वाधिक 11 जागा मिळाल्या.

परंतु यावेळी शिवसेना शिंदे गट 6 जागांवर आग्रही होता. आम्ही लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला जास्त जागा दिल्या, परंतु यावेळी आम्हाला 6 जागा हव्या आहेत अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून घेण्यात आली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील 3 जागांची मागणी करण्यात आली होती. त्यामुळेच महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा अगदी शेवटपर्यंत सुरू असल्याचं पहायला मिळालं.  जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर देखील एकनाथ शिंदे हे 5 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती देखील सूत्रांकडून समोर आली होती.

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीमध्ये घडामोडींना वेग आला आहे.  छत्रपती संभाजीनगर -जालना मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे  या मतदारसंघात महायुतीमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचं पहायला मिळत आहे. ही जागा अधिकृतपणे महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आली असताना देखील या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांचा मुलगा  समीर सत्तार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी चांगलाच जोर लावला होता. परंतु तरी देखील ही जागा भाजपच्या वाट्याला गेली, त्यानंतर इथे बंडखोरी झाल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान समीर सत्तार यांनी माघार न घेतल्यास इथे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, या निवडणुकीमध्ये मोठी चुरस पहायला मिळू शकते.

तर दुसरीकडे अमरावतीमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे. ही जागा भाजपच्या वाट्याला आली आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु त्यानंतर अमरावतीमध्ये देखील बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे विप्लव बाजोरीया यांनी देखील अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अनेक ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे, त्यामुळे आता कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि कोण कायम ठेवणार? हे 4 जून रोजीच स्पष्ट होणार आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार