AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपा स्लो पॉयझन, अब्दुल सत्तार यांच्या गंभीर आरोपांनी राजकारणात खळबळ, महायुतीत मोठा वाद!

आम्ही सत्तेत असून आम्हाला बाहेर जाण्याचा मार्ग दाखवला जातोय. स्थानिक भाजप नेते तसं वागत आहेत, असा संताप यावेळी सत्तार यांनी व्यक्त केला. तसेच मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यथा मांडणार आहे, असेही यावेळी सत्तार यांनी सांगितले.

भाजपा स्लो पॉयझन, अब्दुल सत्तार यांच्या गंभीर आरोपांनी राजकारणात खळबळ, महायुतीत मोठा वाद!
abdul sattar and devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 01, 2026 | 4:17 PM
Share

छत्रपती संभाजीनगरात महायुतीत मोठी धुसफूस पाहायला मिळत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत ही जागा भाजपाच्या वाट्याला आली आहे. भाजपाने या जागेसाटी सुहास शिरसाट यांना उमेदवारीही दिली आहे. आता शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी एकदिलाने भाजपासोबत काम करणे अपेक्षित होते. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट बंडाचा झेंडा फडकवला आहे. अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर सत्तार यांनी समोर येत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. आमचा एक-एक गड संपत चालला आहे. भाजपाकडून शिवसेनेला संपवण्याचं काम केलं जातंय? असा खळबळजनक आरोप सत्तार यांनी केला आहे.

स्थानिक पातळीवर आमच्याविरोधात राजकारण सुरू

पुत्र समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सत्तार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. तसेच आपली मनातली खदखदही सबाहेर काढली. “पहिले आमची ग्रापमंचायत घेतली, जिल्हा परिषद घेतली नंतर महापालिका घेतली. स्थानिक पातळीवर आमच्याविरोधात राजकारण सुरू आहे. स्थानिक पातळीवरची खदखद वेगळं रुप घेऊ शकते. संभाजीनगर आमचा पारंपरिक गड होता, अशा भावना यावेळी सत्तार यांनी व्यक्त केल्या.

मराठवाडा आणि इतर जिल्ह्यामध्ये जे चालू आहे, ते…

तसेच, आमच्या नेत्याला याबाबत माहिती मिळाली नाही तर बंगालमध्ये जे घडलं तेच महाराष्ट्रात घडेल. पहिले ममता बॅनर्जी आणि भाजपची युती होती. जे पश्चिम बंगालमध्ये झाले ते महाराष्ट्रात होता काम नये. आमच्या नेत्याला आम्ही तंतोतंद माहिती देऊ, असं यावेळी सत्तार यांनी सांगितलं. तसेच मराठवाडा आणि इतर जिल्ह्यामध्ये जे चालू आहे, ते पाहिल्यावर दु:ख वाटतं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना संपवण्याचं काम सुरु आहे

आम्ही आमच्या नेत्याला सोडून इथो आलो. भाजप या जुन्या मित्रासोबत आलो. पण पुन्हा तिच परिस्थिती येतेय. हे स्लो पॉयझन आहे. आमचा एक-एक गड संपत चाललाय आहे. आम्ही सत्तेत असून आम्हाला बाहेर जाण्याचा मार्ग दाखवला जातोय. स्थानिक भाजप नेते तसं वागत आहेत, असा संताप यावेळी सत्तार यांनी व्यक्त केला. तसेच मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यथा मांडणार आहे, असेही यावेळी सत्तार यांनी सांगितले. पालकमंत्री आमचा असतानाही शिवसेना संपवण्याचं काम सुरु आहे. पैठण, सिल्लोड सोडलं तर शहराच्या अजूबाजूला सगळे मतदारसंघ संपत आहेत, असा दावाही सत्तार यांनी केला.

….म्हणून माझ्या मुलाला उमेदवारी दिली

काँग्रेसमध्ये असतानाही मी बोललो होतो की काँग्रेस सोन्याच्या ताटात तिकीट घेऊन फिरेल आणि ते तिकीट कोणीही घेणार नाही. अशीच परिस्थिती आमच्यावर येताना दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी उठाव केला सत्तांतर झालं. सत्तांतरात एकनाथ शिंदेंचा सिंहाचा वाटा, असे म्हणत सध्याची शिवसेनेची परिस्थिती दाखवण्यासाठी माझ्या मुलाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार