AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ एकच लग्न झालेल्या व्यक्तीला राज्यात राहण्याचा अधिकार, या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं मोठं विधान

समान नागरिक कायद्याबाबत बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. आता केवळ एकच लग्न झालेल्या व्यक्तीला मध्य प्रदेशात राहण्याचा कायदेशीरदृष्या अधिकार असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

केवळ एकच लग्न झालेल्या व्यक्तीला राज्यात राहण्याचा अधिकार, या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं मोठं विधान
Mohan YadavImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 17, 2026 | 10:29 PM
Share

समान नागरिक कायद्याबाबत बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. आता केवळ एकच लग्न झालेल्या व्यक्तीला मध्य प्रदेशात राहण्याचा कायदेशीरदृष्या अधिकार असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना यादव असंही म्हणाले की, जर देशात एक देश, एक प्रधान आणि एक निशाण अशी व्यवस्था पाहिजे तर मग एकाच देशात राहणार्‍या वेगवेगळ्या समाजाच्या लोकांसाठी वेगवेगळ्या कायद्याची काय गरज आहे? काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी इंदौरमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना म्हटलं होतं की, जर भगवान राम एकच लग्न करत असतील तर रहीमकडून देखील एकाच लग्नाची अपेक्षा केली गेली पाहिजे.

मुस्लिम महिला या आमच्या बहि‍णी आहेत, त्यांना देखील समान अधिकार मिळाले पाहिजेत, आमचा उद्देश कोणत्याही समाजासोबत भेदभाव करणे नसून, प्रत्येक नागरिकांना समान कायदा आणि समान अधिकार मिळून देणे आहे. त्यामुळे आता जो एकच लग्न करेल त्यालाच मध्य प्रदेशात कायदेशीररित्या राहण्याचा अधिकार असेल, असं मोहन यादव यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी ते तीन तलाकवर देखील बोलले आहेत. जर कोणी तीन तलाकसारखी गोष्ट केली तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, तीन तलाक सारख्या गोष्टी आता हद्दपार झाल्या आहेत.

आम्ही समान नागरी कायद्याच्या दिशेने पाऊल टाकत आहोत. कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो, प्रत्येकाला समान अधिकार मिळाले पाहिजेत, समान कायदा असला पाहिजे, हीच खरी लोकशाहीची ओळख आहे. दरम्यान दुसरीकडे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या या विधानाचं उत्तर प्रदेशचे शाही चीफ मुफ्ती मौलाना चौधरी इफ्राहीम हुसैन यांनी समर्थन केलं आहे. मुख्यमंत्री जे बोलले ते योग्यच बोलले, आम्ही मुख्यमंत्र्याच्या विधानाचं कौतुक करतो, असं त्यांनी म्हटलं आहे. मुस्लिम धर्म देखील हेच सांगतो की कोणत्याही समाजाची बहीण असेल मुलगी असेल किंवा कोणीही असेल कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे, असं, त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा