NCP Merger Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडमोडी, दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या उंबरठ्यावर का? पार्थ पवार पुन्हा सिल्वर ओकवर

NCP Merger Politics : आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुद्धा पार्थ पवार सिल्वर ओकवर गेले आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाच्या उंबरठ्यावर आहेत का? या चर्चा सुरु झाल्या आहेत.

NCP Merger Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडमोडी, दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या उंबरठ्यावर का? पार्थ पवार पुन्हा सिल्वर ओकवर
Parth Pawar-Sharad Pawar
| Updated on: Nov 08, 2026 | 2:08 PM

महाराष्ट्राच राजकारण पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाभोवती केंद्रीत झालं आहे. येत्या काळात राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शरद पवार रुग्णालयात दाखल होते. काल त्यांना डिस्चार्ज मिळाला. शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात असताना, अजित पवार राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल त्यांना भेटायला गेलेले. त्यावेळी पवार आणि पटेल यांच्या संवादातील एक वाक्य बाहेर आलं. 10 तारखेनंतर बोलू असं पवार प्रफुल पटेल यांना बोलले. त्यावरुन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार राष्ट्रवादीकडून या सर्व अफवा असून त्यात काही तथ्य नाहीय असं सांगितलं जातय. पण पार्थ पवार काल सिल्वर ओकवर गेले होते. तब्बल दोन तास त्या्ंनी शरद पवारांसोबत चर्चा केली.

त्यानंतर आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुद्धा पार्थ पवार सिल्वर ओकवर गेले आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाच्या उंबरठ्यावर आहेत का? या चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार हे आजारी आहेत म्हणून कौटुंबिक कारणासाठी पार्थ पवार हे शरद पवारांना भेटले की, यामागे काही राजकीय कारण आहे, या बद्दल सध्या तरी तर्क-वितर्कचं वर्तवले जाऊ शकतात. अजित पवार यांच्या निधनानंतर सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु झालेल्या. त्यावेळी अजित पवार हयात असताना शरद पवार गटाच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याच स्पष्ट झालेलं. अजित पवार हयात असते तर कदाचित दोन्ही राष्ट्रवादी आज एकत्र असत्या अशी सुद्धा शक्यता राजकीय तज्ज्ञ बोलून दाखवतायत.

Loading...

मग मोदींचं नेतृत्व त्यांना मान्य होतं का?

शरद पवार यांना कालच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. याआधी शरद पवारांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं. तिथून डिस्चार्ज केल्यानंतर लगेच त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आलं. पवार हॉस्पिटलमध्ये असताना अनेक नेत्यांनी त्यांच्या भेटी घेतल्या. गौतम अदानी, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ हे रुग्णालयात जाऊन पवारांना भेटले. “विलीनीकरण करायचं म्हणजे तुतारी पक्ष घड्याळसोबत येऊन एकत्रित राष्ट्रवादी करायची. मग मोदींचं नेतृत्व त्यांना मान्य होतं का? आज मान्य असेल तर मग फुटीची काही गरजच नव्हती” असं सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us