पोलीस भरतीत अडथळ्यांची शर्यतपार होणार, मासिक पाळी आल्यास मैदानी चाचणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय

तरुणींना पोलीस भरतीत आता त्यांच्या मासिक पाळीची अडचण येणार नाहीत. कारण सरकारने घेतलेल्या एका निर्णयाने आता तरुणींना फायदा होणार आहे. काय झाला नेमका निर्णय पाहूयात...

पोलीस भरतीत अडथळ्यांची शर्यतपार होणार, मासिक पाळी आल्यास मैदानी चाचणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय
Police Bharti news
| Updated on: Nov 20, 2026 | 4:04 PM

Police Recruitment: राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींसाठी दिलासदायक बातमी आहे. पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी (menstrual cycle) आली तरी त्यांची मैदानी चाचणी आता हुकणार नाही. कारणे अशा उमेदवारांना आरोग्य तपासणीनंतर पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींना फायदा होणार आहे.

पोलीस भरतीसाठी तरुणी अनेक महिने तयारी करत असतात. मात्र, ऐन मैदानी चाचणी ( शारीरिक चाचणी स्पर्धा ) वेळी जर मासिक पाळी (menstrual cycle) तर त्या वेदनांमुळे तरुणींची निराशा होते आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर पडल्या जातात. पोलीस भरतीच्यावेळी अनेक तरुणी आपल्या ऐन मैदानी चाचणीच्या वेळी मासिक पाळी येऊ नये यासाठी प्रार्थना करत असतात. कारण जर चुकून शारीरिक चाचण्या सुरु असताना जर मासिक पाळी आली तर सर्व वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरते आणि भरतीची संधी वाया जात असते. परंतू आता तरुणींची या कारणामुळे संधी हुकणार नाही.

Loading...

तर मैदान चाचण्यांना मुदतवाढ

मासिक पाळीच्या काळात अनेक तरुणींना हातापायात गोळे येणे, तीव्र पोटदुखी, चक्कर, अशक्तपणा याचा त्रास होत असतो. अशा वेळी १०० मीटर आणि ८०० मीटर धावण्याची चाचणी, गोळाफेक तसेच लांबउडी सारख्या शारीरिक चाचणी परीक्षा देताना अडचणी येतात. यामुळे अनेक तरुणींमध्ये याची धास्ती असते. त्यामुळे त्यांना भरतीची संधी गमावण्याचे टेन्शन असते. त्यामुळे या गोष्टींचा विचार करुन आता राज्य सरकारने पोलीस भरतीतील तरुणींच्या शारीरिक चाचणीच्या वेळी जर मासिक पाळी आली असेल तर त्यांच्या मैदानी चाचण्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर घेण्यात येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us