…आणि यशोमती ठाकूर यांना सेल्फीचा मोह आवरला नाही

| Updated on: Jan 24, 2021 | 3:41 PM

यशोमती ठाकूर यांना खामगाव तालुक्यातील एका कार्यक्रमात सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. Yashomati Thakur Khamgaon Buldana

...आणि यशोमती ठाकूर यांना सेल्फीचा मोह आवरला नाही
यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री
Follow us on

बुलडाणा: राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना खामगाव तालुक्यातील एका कार्यक्रमात सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. यशोमती ठाकूर यांनी या कार्यक्रमात त्या कोणत्या गोष्टीला घाबरतात याची माहिती दिलीय. विदर्भातील रजतनगरी म्हणून ओळख असलेल्या खामगाव मतदार संघातील काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्याकडील कोणताही कार्यक्रम म्हणजे मंत्रिमंडळातील मंत्री, सनई, चौघडा, घोडे आणि फेटे आलेच. शिवाय सार्वजनिक कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे? हे सानंदा यांच्याकडून शिकलेच पाहिजे, हे सर्वांना माहीतच आहे, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. (Yashomati Thakur take selfie in public programme at Khamgaon Buldana)

ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी सदस्यांचा सत्कार

दिलीपकुमार सानंदा यांनी शनिवारी खामगाव तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. सानंदा यांच्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजेच अतिशय नियोजनबनद्धरित्या कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना फेटे बांधण्यात आले होते. शिवाय मांचावरील असलेल्या मंत्र्यांसह इतरांना ही फेटे बांधले होते. एवढ्या चांगल्या आनंदाच्या कार्यक्रमात सेल्फी काढण्याचा मोह कुणाला होणार नाही. अहो मग काय, फेटा बांधल्यावर आनंदित झालेल्या यशोमती ठाकूर यांना राहावले नाही अन..त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. अखेर यशोमती ठाकूर यांनी सेल्फी काढलीच.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मतदार संघातील महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते हा सत्कार होता. मात्र, माजी आमदार दिलीपकुमार सानंदाचा कार्यक्रम म्हणजे नो चॅलेंज अशी परिस्थिती असते. कारण सानंदा यांचा कोणताही कार्यक्रम म्हणजे मंत्र्यांची उपस्थिती असेतच. सनई , घोडे आणि फेटे आलेच असतातच.शनिवारी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना फेटे बांधले होते. यावेळी मंत्री यशोमती ठाकूर यांनी फेटा बांधत थेट सेल्फी काढली.

दिलीपकुमार सानंदा यांच्याकडं शिकवणी लावावी लागते

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या नियोजनाची स्तूती यशोमती ठाकूर यांनी केली. मात्र, सानंदा यांना आपण नियोजनाच्या बाबतीत घाबरतो, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.दिलीपकुमार सानंदा यांच्यासारखं शिस्तबद्ध नियोजन कोणी करु शकत नाही. दिलीपकुमार सानंदा माझे गुरु असून त्यांच्याकडे शिकवणी लावावी लागते, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

संबंधित बातम्या:

शुक्राचार्यांना बाजूला करा; शरद पवारांनी साधला ‘या’ नेत्यावर निशाणा

अण्णांना शांत करण्याचा भाजपचा प्रयत्न तर आघाडीचा भडकवण्याचा? वाचा गृहमंत्री देशमुख काय म्हणतायत?

(Yashomati Thakur take selfie in public programme at Khamgaon Buldana)