
वाशिमः काँग्रेसची भारत जोडो यात्रेला सध्या उदंड प्रतिसाद लाभत असल्याचा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना मिळत आहे. भारत जोडो यात्रेबद्दल माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी सांगितले की, ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली आहे. आणि ती जम्मू काश्मीरपर्यंत जाणार आहे. त्याबरोबरच या यात्रेत लाखो लोक चालले आहेत आणि लाखो लोक सहभागी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी सांगितले की, द्वेष, भय आणि हिंसा पसरवली जात आहे. त्या विरोधात ही यात्रा असल्याचे सांगत आरएसएस, भाजपा यांच्याकडून समाजात प्रथम भय पसरवले जाते मग द्वेष पसरवतात अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.
येथील शेतकरी पहाटे 4 वाजता कामाला सुरुवात करतो तरीही भाजपकडून शेतकऱ्यांना भयभीत केले जात आहे. त्यांच्या मालाला योग्य भाव दिला जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याची टीकाही त्यांच्याकडून केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विमा देण्यात येतो मात्र ते खाजगी कंपनीला देतात, शेतकऱ्यांना त्यांचेच पैसे मिळतत नाहीत अशी टीकाही त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
या केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खिशातील पैसे खाजगी कंपन्यांच्या खिशात घातले जात आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांवर पीक विकण्याची वेळ येते आहे. तरीही निर्यात बंद करुन आयात सुरू केली जाते असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला.
राहुल गांधी यांनी कर्जमाफीवरही निशाणा साधला. नरेंद्र मोदी सरकार अरबपतींचे कर्ज दोन मिनिटात माफ करतात मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात नाही. डिझेल-पेट्रोल, गॅसचे दर प्रचंड वाढवले जातात.
नरेंद्र मोदी सांगतात की, यूपीएच्या काळात सिलेंडर 450 म्हणून टीका करत होते. तर आज 1200 रुपये सिलिंडर आहे. त्याचे पैसे कुठे जाताता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.