Yavatmal Police | यवतमाळात पोलीस जमादाराने घेतला गळफास, पोलीस अधीक्षकांवर त्रास दिल्याचा आरोप, चिठ्ठीत लिहिले जीवन संपविण्याचे कारण

| Updated on: Jun 18, 2022 | 12:51 PM

कोरडे यांची नेमणूक बिटरगाव पोलीस ठाण्यात होती. त्यांचा गंभीर अपघात झाला असल्याने त्यांचे शरीर दुखापतग्रस्त होते. त्यांची एका डेथ इन कस्टडी प्रकरणात चौकशी सुरू आहे. ही चौकशी पुसदमध्ये हस्तांतरित करावी. बदलीदेखील पुसदमध्ये करावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र पोलीस अधीक्षकांनी ती जाणीवपूर्वक बेदखल केली. असा आरोप चिठ्ठीत करण्यात आलाय.

Yavatmal Police | यवतमाळात पोलीस जमादाराने घेतला गळफास, पोलीस अधीक्षकांवर त्रास दिल्याचा आरोप, चिठ्ठीत लिहिले जीवन संपविण्याचे कारण
यवतमाळात पोलीस जमादाराने घेतला गळफास
Follow us on

यवतमाळ : यवतमाळच्या पुसद (Pusad) येथे एका पोलीस जमादाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. विष्णू कोरडे (Vishnu Korde) असे या पोलीस जमादाराचे नाव आहे. त्यांनी आत्महत्येसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील (Dr. Dilip Bhujbal) यांना जबाबदार धरले आहे. मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिट्ठीत पोलीस अधीक्षक यांनी विनाकारण त्रास दिला. अपमानित केले. गंभीर आजारी असतानाही बदलीची विनंती मान्य केली नाही. त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे विष्णू कोरडे यांनी लिहून ठेवले आहे. याबाबत सीबीआय चौकशी करावी, असेही त्यांनी लिहून ठेवले आहे.

पोलीस अधीक्षकांवर कारवाईची मागणी

कोरडे यांची नेमणूक बिटरगाव पोलीस ठाण्यात होती. त्यांचा गंभीर अपघात झाला असल्याने त्यांचे शरीर दुखापतग्रस्त होते. त्यांची एका डेथ इन कस्टडी प्रकरणात चौकशी सुरू आहे. ही चौकशी पुसदमध्ये हस्तांतरित करावी. बदलीदेखील पुसदमध्ये करावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र पोलीस अधीक्षकांनी ती जाणीवपूर्वक बेदखल केली. असा आरोप चिठ्ठीत करण्यात आलाय. त्यामुळे पोलीस अधीक्षकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी मृतकाचा भाऊ विलास कोरडे यांनी केली. पोलीस अधीक्षकांच्या जाचामुळे अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी त्रस्त असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार राजू नजरधने यांनी केला आहे.

चिठ्ठीत नेमकं काय

विष्णू कोरडे यांनी पोलीस अधीक्षकांच्या विरोधात चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यांनी चिठ्ठीत लिहिलं की, मला पोलीस अधीक्षकांनी खूप त्रास दिली. माझ्यासारख्या बऱ्याच पोलिसांना ते त्रास देतात. कर्मचाऱ्यांना नेहमी दबावाखाली ठेवतात. मी बदली मागितली. पण, मला बदली दिली नाही. माझी तब्ब्येत बरी नसताना मला त्रास दिला जात होता. शेवटी त्रास किती दिवस सहन करायचा. त्यामुळं शेवटचा निर्णय घेतला. पण, या प्रकरणी पोलीस अधीक्षकांवर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणीही विष्णू कोरडे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा