Nagpur Smart City | नागपूर स्मार्ट सिटी खरेदी करणार 25 ई-बस, 35 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता, शहरात 75 ठिकाणी सायकल स्टँड

सुरक्षित सायकल स्टँड उभारण्याच्या दृष्टीने नागपूर स्मार्ट सिटीतर्फे हा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी सुमारे 1 कोटी 39 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिली.

Nagpur Smart City | नागपूर स्मार्ट सिटी खरेदी करणार 25 ई-बस, 35 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता, शहरात 75 ठिकाणी सायकल स्टँड
नागपूर स्मार्ट सिटी खरेदी करणार 25 ई-बसImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 12:23 PM

नागपूर : नागपूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत 25 ई बसेस खरेदी (Shopping) केल्या जाणार आहेत. यासाठी 35 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. नागपूरला प्रदूषणमुक्त करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (Smart & Sustainable City Development Corporation Limited) पर्यावरणपूरक 25 इलेक्ट्रिक मिडी बस (Electric Midi Bus) खरेदी करण्यात येतील. या संदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. यापूर्वी 15 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. टाटा मोटर्ससोबत करार करण्यात आलाय. आता यामध्ये आणखी 25 बसेसची भर पडणाराय.

शहरात 75 ठिकाणी सायकल स्टँड

नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने नागपूर शहरात विविध 75 ठिकाणी सायकल स्टँड उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या सायकल स्टँडवर जाहिरातीद्वारे उत्पन्न प्राप्त करण्यात येणार आहे. कोरोना काळात नागपूर शहरात सायकलचा वापर वाढला आहे. आरोग्यासाठी तसेच कामावर जाण्यासाठी लोक सायकलचा वापर करतात. त्यांच्यासाठी सुरक्षित सायकल स्टँड उभारण्याच्या दृष्टीने नागपूर स्मार्ट सिटीतर्फे हा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी सुमारे 1 कोटी 39 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिली.

उद्यानात कला शिल्प उभारणार

नागपूर स्मार्ट सिटीतर्फे शहरातील सौंदर्यीकरणावरही भर देण्यात येईल. नागपूर शहरातील दोन उद्यानांचा या सौंदर्यीकरणात समावेश आहे. सूर्यनगर येथील लता मंगेशकर उद्यान आणि दत्तात्रय नगर येथील संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी उद्यान येथे सार्वजनिक कला शिल्प (Public Realm and Art) उभारण्यात येणाराय. प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. एजन्सीला कार्यादेश देण्यात आले आहे. या कामावर जवळपास 54 लाख रुपयांचा निधी खर्च होणार आहे.

हे सुद्धा वाचा

फायदे काय होणार

वाहनांमुळं प्रदूषण जास्त होते. ई बसमुळं प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. शहरात सायकल स्टँड झाल्यास सायकल चोरी तर जाणार नाही ना, याची भीती कमी होईल. सायकलसाठी हक्काची जागा मिळाल्यास लोकं सायकलचा वापर वाढवतील. शिवाय उद्यानात कला शिल्प उभारल्यास सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने त्याचा फायदा होणार आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.