VIDEO | योगिनी एकादशी निमित्ताने पंढरीनगरी भाविकांनी फुलली

कोरोना पार्श्वभूमीवर वारी ही प्रातनिधिक स्वरुपात साजरी करा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आज योगिनी एकादशी निमित्ताने पंढरीत वारकरी आणि भाविकांनी एकच गर्दी केली.

VIDEO | योगिनी एकादशी निमित्ताने पंढरीनगरी भाविकांनी फुलली


पंढरपूर : वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाची आषाढी वारी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र राज्य सरकारकडून कोरोना पार्श्वभूमीवर वारी ही प्रातनिधिक स्वरुपात साजरी करा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आज योगिनी एकादशी निमित्ताने पंढरीत वारकरी आणि भाविकांनी एकच गर्दी केली. (Yogini Ekadashi 2021 crowd of devotees and devotees gathered in Pandharpur)

वारकरी माघारी

कोरोनामुळे पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे. माऊलींच्या चलपादुका विशेष वाहनाने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर योगिनी एकादशी निमित्ताने अनेक वारकरी आणि भाविकांना चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठलाच्या कळसाचे आणि नामदेव पारीचे दर्शन घेऊन माघारी परतावे लागत आहे.

दुकानात भाविकांनी मोठी गर्दी

आज पंधरा दिवसांची एकादशी आहे. यामुळे पंढरपूरमध्ये अनेक भाविकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या बऱ्याच दिवसांनंतर पंढरीतील चंद्रभागा नदी, प्रदक्षिणा मार्ग, संत नामदेव पायरी , महाद्वार या ठिकाणी भाविकांची लगबग पाहायला मिळत आहे. तसेच प्रासादिक वस्तू विक्रीसाठी दुकानात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आषाढी एकादशी पूर्वीच भाविकांनी आता येऊन कळस आणि संत नामदेव महाराज पायरीचे दर्शन घेऊन धन्यता मनाली आहे.

पाहा व्हिडीओ : 

(Yogini Ekadashi 2021 crowd of devotees and devotees gathered in Pandharpur)

संबंधित बातम्या : 

यंदाही मुख्यमंत्र्यांसोबत पंढरपूरच्या विठूरायाची शासकीय पुजा करण्याचा मान विणेकऱ्यांना, चिठ्ठ्या टाकून निवड

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनाची बैठक, वारकरी ते मुख्यमंत्र्यांसाठी काय नियोजन?

प्रत्येकी 100 वारकरी, 1.5 किमी पायी वारी, आषाढी वारीसाठी प्रशासनाकडून नियमावली जाहीर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI