AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार? युगेंद्र पवारांची मोठी घोषणा

Yugendra Pawar News: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांमध्येच आता युगेंद्र पवारांनी मोठे वक्तव्य केले आहे. निवडणुकीवर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार? युगेंद्र पवारांची मोठी घोषणा
| Updated on: Sep 30, 2026 | 7:15 PM
Share

बारामतील सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच आता युगेंद्र पवारांनी मोठी घोषणा केली आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. अशातच दुसरीकडे युगेंद्र पवारांनी मोठी घोषणा करत स्वबळाचा नारा दिला आहे.

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने स्वतंत्र 21 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमेश्वर शेतकरी विकास पॅनलची घोषणा युवा नेते युगेंद्र पवार यांनी केली आहे. या निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील पॅनेल देण्यात आलं आहे.

यावेळी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, आमचं पॅनल पवार साहेबांच्या पक्षाचं पुरस्कृत पॅनल आहे. सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल हे आमच्या पॅनलचं नाव आहे. आम्ही सर्वच्या सर्व जागा लढवणार आहोत. अगोदर जी आमची भूमिका होती तीच आता आहे. वेगळं काही करत नाही. सुरुवातीला आम्ही स्थिर होतो आताही आम्ही स्थिर आहोत आणि चांगले तगडे उमेदवार आमच्या पॅनल मध्ये आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे.

ते म्हणाले की, उद्या सकाळी नऊ-साडेनऊ वाजता आमची अधिकृत यादी जाहीर करणार आहोत. पुरंदरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोन नेत्यांचा पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलला पाठिंबा आहे. यावर युगेंद्र पवारांनी सांगितलं की, त्यांनी पाठिंबा दिलेला नाही. आम्हीच त्यांना तिथे पाठवलं. ते तिथे चर्चा करत होते. आपण सर्वांशी चर्चा करू शकतो, तिथं जाणं ही चुकीचं किंवा गैर नाही ते मला सांगून गेले आहेत, अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवारांनी दिली आहे.

Follow Us
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!