AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravi Rana : त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं पण आम्ही मात्र उद्धव ठाकरेंचं..रवी राणा यांची उपरोधिक प्रतिक्रिया

Ravi Rana : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रवी राणा आणि त्यांची पत्नी नवनीत राणा यांनी मुंबईत आंदोलनासाठी आले होते. ते हनुमान चालीसा पठण करणार होते. पण उद्धव ठाकरे सरकारने त्यांना रोखलं.

Ravi Rana : त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं पण आम्ही मात्र उद्धव ठाकरेंचं..रवी राणा यांची उपरोधिक प्रतिक्रिया
uddhav Thackeray-ravi rana
| Updated on: Jul 13, 2026 | 1:56 PM
Share

उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन सुरु केलं आहे. मुंबईत दादर येथे मागच्या आठवड्यात त्यांनी या आंदोलनाची सुरुवात केली. अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणाचा मुद्दा उद्धव ठाकरे लावून धरण्याचा प्रयत्न करत आहेत. या द्वारे ते पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या वाटेवर परतत आहेत. मुंबईनंतर ते आता नागपूरमध्ये येऊन रामरक्षा आंदोलन करणार आहेत. नागपूरमध्ये उद्धव ठाकरे आंदोलन करणारं त्याचं एक वेगळं महत्व आहे. कारण नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. अयोध्या राम मंदिर आंदोलनात आणि ते मंदिर उभीरणीत संघाची एक महत्वाची भूमिका आहे.

युवा स्वाभिमान पार्टीचे रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या नागपूरमधील आंदोलनावर उपरोधिक टीका केली आहे. “उद्धव ठाकरे नागपूरला येत आहेत, तर त्यांनी संघ मुख्यालयात जाऊन हेडगेवार यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आपल्या कपाळाला तेथील माती लावली पाहिजे” असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. “आम्ही हनुमान चालीसा म्हटली म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकलं. मात्र उद्धव ठाकरे यांचं आता शुद्धीकरण होत आहे. उद्धव ठाकरे यांचे आमदार आणि खासदार गेल्यावर त्यांना आता हनुमान जी आठवत आहेत” असं रवी राणा म्हणाले.

आम्ही त्यांचे स्वागत करू

“उद्धव ठाकरे यांची परिस्थिती एखादा व्यक्ती भुला भटका जो दुसऱ्या मार्गाने गेला अशी झाली. संकट आल्यानंतर आता ते आपल्या दैवताला आठवत आहे. त्यांनी अमरावतीच्या हनुमान गडीवर हनुमान चालीसा म्हणायला यावं. आम्ही त्यांचे स्वागत करू, मी आणि नवनीत राणा त्यांच्या सोबत हनुमान चालीसा म्हणू” असं रवी राणा म्हणाले.

त्यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रवी राणा आणि त्यांची पत्नी नवनीत राणा यांनी मुंबईत आंदोलनासाठी आले होते. ते हनुमान चालीसा पठण करणार होते. पण उद्धव ठाकरे सरकारने त्यांना रोखलं. म्हणून आता उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यावर त्यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे सध्या राजकारणात धक्क्यावर धक्के सहन करत आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ