
राज्यातील 29 महाालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत. आता महापाैर पदावरून रस्सीखेच बघायला मिळत आहे. मात्र, त्यापूर्वी अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसहिंता लागू आहे. महापालिका निवडणुकीत एक वेगळे राजकीय समीकरण बघायला मिळाले. राज्यात सत्तेत असलेली पक्ष विरोधात निवडणुका लढताना दिसली. महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा धक्का कोणाला बसला असेल तर तो म्हणजे अजित पवार यांचा पक्ष. पुण्यासह पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाची कामगिरी निराशाजनक राहिली. जिल्हा परिषद निवडणुका भाजपा, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र लढणार की, वेगवेगळे याबद्दल अजून काही स्पष्ट होऊ शकले नाही. महापालिका निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मुंबई, कल्याण डोबिंवली आणि उल्हासनगर पालिकेत युतीची सत्ता आली. उद्या महापाैर आरक्षण सोडत आहे.
मुंबईसह इतर महापालिकांवर महापाैर नक्की कोणाचा होणार? यावरून विविध चर्चा सुरू असतानाच आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाला भाजपाने अत्यंत मोठा धक्का दिला आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा धक्का बसलाय. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी थेट भाजपाता प्रवेश केला, फक्त बंधूच नाही तर त्यांच्या पुतण्यानेही भाजपात प्रवेश केला.
तानाजी सावंत यांच्या पुतण्याला सोलापूरच्या मानेगावरमधून उमेदवारी मिळाली आहे. अनेक समर्थकांसोबत हा पक्षप्रवेश केला. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी म्हटले की, आमचा सर्व राजकीय प्रवास बघून आम्हाला हा प्रसाद मिळाला आहे. आम्हाला अनेक प्रसंगातून, घरातून अडचणी आणल्या गेल्या. तरी सुद्धा पक्षाने विश्वास दाखवला.
त्यामुळेच आता मला माझा राजकीय प्रवास सफल झाला असं वाटतंय. हा एकप्रकारे मोठा धक्काच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला म्हणावा लागेल. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता फोडाफोडीचे मोठे राजकारण सध्या बघायला मिळत आहे. यावर तानाजी सावंत नेमकी काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. तानाजी सावंत यांचं मोठं राजकीय वलय बघायला मिळते.