संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना घरं खाली करण्याची नोटीस, मेस्माचीही कारवाई

मुंबई: संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. मेस्मा अर्थात ‘महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम कायद्यांतर्गत कर्मचाऱ्यांवर कारवाई होत आहे. 8 जानेवारी अर्थात कालपासून 30 हजार बेस्ट कर्मचारी संपावर आहेत. त्यापैकी शिवसेनेच्या कामगार संघटनेने आपला संप काल स्थगित केला, मात्र दुसरी संघटना संपावर ठाम आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु करण्यात […]

संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना घरं खाली करण्याची नोटीस, मेस्माचीही कारवाई
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई: संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. मेस्मा अर्थात ‘महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम कायद्यांतर्गत कर्मचाऱ्यांवर कारवाई होत आहे. 8 जानेवारी अर्थात कालपासून 30 हजार बेस्ट कर्मचारी संपावर आहेत. त्यापैकी शिवसेनेच्या कामगार संघटनेने आपला संप काल स्थगित केला, मात्र दुसरी संघटना संपावर ठाम आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. यानुसार भोईवाडा, वडाळा, नारायण बिल्डिंग,कुलाबा या वसाहतीमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरं रिकामी करण्याची नोटीस देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 2000 घरांना नोटीस दिली गेली. तर 300 लोकांना मेस्माअंतर्गत कारवाईच्या नोटीस दिल्या आहेत.

सुमारे 300 ते 350 कर्मचाऱ्यांना कामावरुन बडतर्फ करण्याची नोटीस मिळाली आहे. काहींना कोर्टाच्या अवमान करण्याची नोटीसही दिली जाणार आहे. (औद्योगिक न्यायालयाने हा संप करू नये असं सांगितलं होतं)

संप मागे घेण्याचं आवाहन

“संपाबाबत चर्चा सुरु आहे,  पालिका आयुक्तांसोबत चर्चा झाली. ग्रेडबाबत, नवीन वेतनाबाबत चर्चा सुरू आहेत. नवीन वेतन कराराबाबत निर्णय घेणार आहोत.  सर्व युनियनबाबत चर्चा करणार आहोत”, अशी माहिती बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिली. शशांक राव यांच्यासोबत आजही चर्चा करणार आहोत.  संपाला कोर्टाने मनाई केली आहे. कर्मचाऱ्यांना विनंती आहे सर्वांनी कामावर यावं, असं आवाहन बागडे यांनी केलं.

मेस्माची कारवाई करायला सुरुवात केली आहे. बेस्टमध्ये आर्थिक अडचण आहे. 2500 कोटींचं कर्ज आहे. प्रत्येक दिवस 25 लाख प्रवासी प्रवास करतात. दोन दिवसात 6 कोटींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे संप मागे घ्या, जोपर्यत तोडगा निघणार नाही तोपर्यंत चर्चा सुरु राहील, असं बागडे म्हणाले.

संप सुरु राहील – शशांक राव

दरम्यान, कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे, तोडगा निघत नाही तोपर्यंत संप सुरु राहील, असं कामगार नेते आणि बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी म्हटलंय. कर्मचाऱ्यांवर जी कारवाई केली जात आहे, हे शिवसेनेच्या सांगण्यावरून केलं जातं आहे. शिवसेना कामगार अध्यक्ष सुहास सामंत यांच्या सांगण्यावरून महाव्यवस्थापक कारवाई करत आहेत. उद्या वडाळा डेपोवर बेस्ट कर्मचारी कुटुबीय आंदोलन करणार आहेत, अशी माहिती शशांक राव यांनी दिली.

मनसेचा बेस्ट संपाला पाठिंबा

दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाला  मनसेने पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे उद्या याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

* ‘बेस्ट’ उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे.

* 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,930 रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरीत वेतननिश्चिती करावी.

* एप्रिल 2016 पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने चर्चा सुरू करावी.

* 2016-17 आणि 2017-18 करिता पालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस द्यावा.

* कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न सोडवावा.

* अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी.

संबंधित बातम्या

‘बेस्ट’ संप : सेनेच्या युनियनची माघार, शशांक राव मात्र ठाम

LIVE बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, युनियनमध्ये फूट?  

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.