देवेंद्र फडणवीस यांचं पहिलं टीकास्त्र, शपथविधीनंतर ठाकरे सरकारवर पहिला हल्लाबोल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis attack on Uddhav Thackeray) यांनी लगेचच हल्लाबोल सुरु केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं पहिलं टीकास्त्र, शपथविधीनंतर ठाकरे सरकारवर पहिला हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 28, 2019 | 9:09 PM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis attack on Uddhav Thackeray) यांनी लगेचच हल्लाबोल सुरु केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis attack on Uddhav Thackeray)  यांनी आधी अभिनंदनाचं ट्विट केल्यानंतर दुसरं ट्विट थेट टीका करणारं केलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या किमान समान कार्यक्रमावर देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, “महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या”!

देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारकडून या विभागाकडे लक्ष दिलं जाईल अशी आशा व्यक्त केली असली, तरी त्यांनी नामोल्लेख नसल्याचं म्हणत दुर्दैव व्यक्त केलं.

फडणवीस यांनी आधीच्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

देवेंद्र फडणवीसांची शपथविधीला हजेरी

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. वर्षा निवासस्थानातून आज पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर पडले. दिवसभर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेत्या चित्रा वाघ , देवेंद्र फडणवीस यांचे मित्र शैलेश जोगळेकर यांनी आज फडणवीसांची भेट घेतली होती.

उद्धव ठाकरे यांचा शपथविधी 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन आणि आई वडिलांना स्मरुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा ग्रँड शपथविधी सोहळा (Uddhav Thackeray Sworn in Ceremony) सुरु झाला. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यासारख्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत हजारो जण उपस्थित होते. (Uddhav Thackeray Sworn in Ceremony)

उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर राष्ट्रवादी तर्फे जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत शपथ घेतली.

संबंधित बातम्या  

अखेर किमान समान कार्यक्रम जाहीर, हिंदुत्व शब्द नाही! 

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.