प्रजासत्ताक भारताच्या गळ्यात मोदी-शहांचा फास, राज ठाकरेंचं नवं कार्टून

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावरील कार्टून हल्ला प्रजासत्ताक दिनीही कायम ठेवला आहे. राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून नवं कार्टून सोशल मीडियावर शेअर केलं आहे. नव्या कार्टूनमध्ये प्रजासत्ताक भारत दाखवला आहे. या भारताच्या गळ्यात दोरी आहे, ही दोरी मोदी आणि शहा यांनी …

Headline News Today, प्रजासत्ताक भारताच्या गळ्यात मोदी-शहांचा फास, राज ठाकरेंचं नवं कार्टून

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावरील कार्टून हल्ला प्रजासत्ताक दिनीही कायम ठेवला आहे. राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून नवं कार्टून सोशल मीडियावर शेअर केलं आहे. नव्या कार्टूनमध्ये प्रजासत्ताक भारत दाखवला आहे. या भारताच्या गळ्यात दोरी आहे, ही दोरी मोदी आणि शहा यांनी ध्वजारोहणाप्रमाणे ओढली आहे, त्यामुळे प्रचासत्ताक भारताला गळफास लागला आहे, असं कार्टून राज यांनी काढलं आहे. या कार्टूनला ‘स्वतंत्रता न बघवते’ असं हेडिंग दिलं आहे. तर मोदी आणि शाह यांच्याजवळ ‘मोदींचे हात बळकट करा’ असं म्हटलं आहे.

Headline News Today, प्रजासत्ताक भारताच्या गळ्यात मोदी-शहांचा फास, राज ठाकरेंचं नवं कार्टून

राज ठाकरे हे सातत्याने व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर हल्ला चढवत असतात. राज यांच्या कार्टूनचा विषय हे दोघेच असतात. त्याआधी राज ठाकरे यांनी संक्रातीलाही एक कार्टून काढलं होतं. ‘सक्रांत’ असा मथळा देऊन हे कार्टून रेखाटलं होतं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पतंग उडवताना दिसत असून, पतंगावर ‘नव्या थापा, 10 टक्के आरक्षण, इतर’ असे लिहिलेले होते.

खूप दिवसांनी राज ठाकरेंचं ‘मोदी-शाह’ सोडून व्यंगचित्र 

यानंतर बऱ्याच दिवसांनी राज ठाकरेंनी मोदी-शाहा सोडून अन्य विषयावर कार्टून रेखाटलं होतं. टेंभू (कराड) इथे आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. या घटनेच्या अनुशंघाने राज ठाकरे यांनी 21 जानेवारीला हे व्यंगचित्र रेखाटले. यात लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर दाखवले. त्यांच्या आजूबाजूला समस्या दाखवल्या. महिलावंरील अत्याचार, जातीय संघर्ष, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या इत्यादी गोष्टी दाखवल्या.

संबंधित बातम्या 

भाजपची उचलेगिरी, प्रत्युत्तरासाठी राज ठाकरेंनी काढलेलंच व्यंगचित्र वापरलं!

वाघाच्या तोंडात युतीचे पाय, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र  

खूप दिवसांनी राज ठाकरेंचं ‘मोदी-शाह’ सोडून व्यंगचित्र 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *