Maharashtra Political News live : भारत तरुणांचा देश, तरुण हेच देशाचे भवितव्य- मुख्यमंत्री शिंदे

| Updated on: May 05, 2024 | 8:14 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 4 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News live : भारत तरुणांचा देश, तरुण हेच देशाचे भवितव्य- मुख्यमंत्री शिंदे

बारामती लोकसभा मतदारसंघात आज सभांचा धडाका. महायुती आणि महाविकास आघाडीकडून बारामती लोकसभा मतदारसंघात आज मोठं शक्ती प्रदर्शन. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यात चार सभा, तर सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीकडून दौंड मधल्या वरवंड येथे सभेचं आयोजन. शरद पवार यांच्या उपस्थितीत वरवंड येथे पार पडणार महाविकास आघाडीची जाहीर सभा. बाळासाहेब थोरात ,आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, भूषण सिंहराजे होळकर  महाविकास आघाडीच्या सभेसाठी लावणार हजेरी. पुणे शहरात आंब्यांची आवक वाढली. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये दिवसाला आठ ते दहा हजार पेटी आंब्यांची आवक. पुढील आठवड्यात अक्षय तृतीया असल्याने आंब्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता. आंब्याच्या भावामध्ये वाढ तरी देखील मागणी तितकीच. पुणे शहरात आंब्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 May 2024 06:26 PM (IST)

    उल्हासनगरात एसीच्या शॉर्टसर्किटमुळे इमारतीला आग

    उल्हासनगरात एका इमारतीला भीषण आग. कॅम्प ५ मधील जेकेआरके इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग. आगीत 3 लाखाचं नुकसान. आगीत कॉम्प्युटर तसेच पेपर जळून खाक. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. एसी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश

  • 04 May 2024 06:24 PM (IST)

    भाजपचे नेते विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या भेटीला

    धाराशिव : तुळजापूर येथील भाजपचे नेते देवानंद रोचकरी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या भेटीला. रोचकरी यांचे तुळजापूर तालुक्यात मोठे प्रस्थ, देवानंद रोचकरी मित्र मंडळाचे मोठे जाळे. रोचकरी हे लोकसभा निवडणुकीत ओमराजे यांना मदत करण्याची शक्यता.

  • 04 May 2024 06:03 PM (IST)

    गावकी किंवा भावकीची नाही तर देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक - अजित पवार

    बारामती : ही निवडणूक गावकी किंवा भावकीची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. 5 वर्षात विकासाची अनेक कामे झाली आहेत. सर्व समाजाला योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे. योजनांपासून कोणताही समाज दूर राहू नये हा महायुतीचा प्रयत्न आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

  • 04 May 2024 06:01 PM (IST)

    राज ठाकरे कणकवलीत दाखल, नितेश राणे करणार स्वागत

    राज ठाकरे यांचे नारायण राणेंच्या कणकवली येथील नीलम कंट्रीसाईड या हॉटेलात होणार आगमन. नितेश राणे करणार राज ठाकरे यांचे स्वागत. मनसे नेते नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांचे नितेश राणेंनी केले स्वागत.

  • 04 May 2024 05:34 PM (IST)

    दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जे.पी गावित माघार घेण्याची शक्यता

    नाशिक : जेपी गावित आपली उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे. माकपाची उद्या महत्वाची बैठक होणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून ही बैठक बोलण्यात आली आहे. जेपी गावित यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे.

  • 04 May 2024 05:30 PM (IST)

    मोदी देशाला विकासाकडे नेत आहेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    लोकशाहीत प्रत्येक मताला महत्त्व आहे. भारत हा युवकांचा आणि तरुणांचा देश आहे. तरुण तुम्ही देशाचे भवितव्य आहात. देश योग्य मजबूत हातात जातो, तेंव्हा देशाचा विकास होतो. मोदी करुन दाखवतात, देशाला विकासाकडे नेत आहेत. क्रांती घडवण्याची ताकद तुमच्या हातात आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

  • 04 May 2024 01:58 PM (IST)

    सुपारीखोर अशा शब्दात शरद कोळींची आमदार रमेश पाटलांवर टीका

    देवेंद्र फडणवीस यांचे ऐकून रमेश पाटलाने कोळी समाजाचा घात केला.

  • 04 May 2024 01:28 PM (IST)

    उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

    लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान यवतमाळ जिल्ह्यात काही अज्ञातांनी उदय सामंत यांच्या कारच्या ताफ्यावर दगडफेक केल्यानंतर वाढवली सुरक्षा.

  • 04 May 2024 01:04 PM (IST)

    प्रणिती शिंदे हिने केली भाजपावर जोरदार टीका

    भाजपने दहा वर्षात तुमच्या मतांचा वापर केला आणि सत्तेची मजा लुटली. मी तुमची बहीण या नात्याने सांगते तुमचा विश्वासघात होऊ देणार नाही, असे प्रणिती शिंदे हिने म्हटले आहे.

  • 04 May 2024 12:50 PM (IST)

    मोदी खिडकीतून डोकावतायेत

    मोदी हे वारंवार आमच्याकडे खिडकीतून डोकावून पाहत आहेत आणि त्यातच कळत आहे. देशातील निकाल कोणत्या दिशेने चालला आहे. पण मोदींनी कितीही डोळे मारले, खुणावलं खिडकीतून गच्चीवरून फटीतून दारातून पायरीवरून तरी महाविकास आघाडीतला कोणताही घटक हा कोणत्याही आमिषाला दहशतीला बळी पडणार नाही. शरद पवार -ठाकरेंची मदत घ्याची वेळ मोदींवर येऊ नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

  • 04 May 2024 12:40 PM (IST)

    धुळे लोकसभा निवडणुकीसाठी 30 उमेदवारांचे 42 अर्ज

    धुळे लोकसभा निवडणुकीसाठी 30 उमेदवारांचे 42 अर्ज दाखल झाले आहेत. 66 उमेदवारांनी 118 अर्ज खरेदी केले होते. आतापर्यंत भाजपाच्या वतीने सुभाष भामरे, काँग्रेसच्या वतीने डॉक्टर शोभा बच्छाव वंचित आघाडीच्या वतीने अब्दुल रहमान, डॉक्टर राहुल भामरे, दिनेश बच्छाव, मोतीराम बच्छाव, संजय शर्मा या प्रमुख उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

  • 04 May 2024 12:30 PM (IST)

    दीपक केसरकरांचा हल्लाबोल

    बाळासाहेबांचे विचार हे शिवसेनेचे विचार आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचं नाव शिवसेनेसोबत जोडले गेले आहे. राहुल गांधी जेव्हा सावरकरांवर बोलतात तेव्हा तुमचे चिरंजीव त्यांना जाऊन मिठी मारतात. तुम्ही अस चुकीचं बोलत राहिलात तर पक्षाचा प्रवक्ता म्हणून मला बोलवच लागेल, असा हल्लाबोल दीपक केसरकर यांनी केला.

  • 04 May 2024 12:20 PM (IST)

    एका निर्णयाने शेतकरी मालामाल

    केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी हटवल्याने लासलगाव बाजार समितीत कांदा बाजार भावात वाढ झाली. 500 ते 800 रुपयांची प्रति क्विंटल मागे कांद्याच्या बाजार भावात वाढ दिसून आली. कांद्याच्या बाजार भावात वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • 04 May 2024 12:10 PM (IST)

    संजय राऊत यांचा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

    ठाणे आणि डोंबिवली परिसरामध्ये अनेक गुंड टोळ्या मिळून त्यांचा पक्ष निर्माण झाला आहे. शिवसैनिकांचा तो पक्ष नाही. तुरुंगातून गुंडांना सोडायचं, गुन्हेगारी आरोप असलेल्या पोलिसांना सोडायचं आणि त्यांचा वापर या राजकारणासाठी करून घ्यायचा ही सध्या राज्यातली स्थिती असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोळ्याला पट्टी लावून बसले आहेत किंवा डोळ्यांना सहन करीत असल्याची टीका त्यांनी केली.

  • 04 May 2024 12:00 PM (IST)

    Live Update | सुनेत्रा पवार या आज भोर तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर

    महायुतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज भोर तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर... दौऱ्यादरम्यान भोर शहरातल्या प्रमुख मार्गांवरून काढली पदयात्रा... पदयात्रा काढून नागरिकांसोबत साधला संवाद, घड्याळाला मतदान करण्याचं केलं आवाहन... पदयात्रेच्या माध्यमातून प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा सुनेत्रा पवार यांचा प्रयत्न

  • 04 May 2024 12:00 PM (IST)

    सुप्रिया सुळे यांच्यावर महादेव जानकरांचा हल्लाबोल

    सुप्रिया ताईंना मी सांगेन बहिणीने भावाच्या घरी जास्त दिवस नाही राहिलं पाहिजे. बहिणीने तीच्या घरी जावं, देशाच एनडीएच सरकार बनत आहे, बारामतीचा खासदार हा सरकारला समर्थन करणारा बनावा म्हणून सांगायला आलोय असा हल्लाबोल रासपचे महादेव जानकर यांनी केला.

  • 04 May 2024 11:55 AM (IST)

    Live Update | कांदा निर्यातबंदी हटवल्याने लासलगाव बाजार समितीत कांदा बाजार भावात वाढ

    कांदा निर्यातबंदी हटवल्याने लासलगाव बाजार समितीत कांदा बाजार भावात वाढ... 500 ते 800 रुपयांची प्रति क्विंटल मागे कांद्याच्या बाजार भावात वाढ.... कांद्याच्या बाजार भावात वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा... मात्र कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची नाराजगी कायम... कांदा निर्यातबंदी दरम्यान झालेले नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी....

  • 04 May 2024 11:30 AM (IST)

    Live Update | आपला देश सुखी समृद्ध संपन्न व्हावा अशी देवीच्या चरणी प्रार्थना - नितीन गडकरी

    लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आई अंबाबाईचे दर्शन घेण्याचा योग आला... आपला देश सुखी समृद्ध संपन्न व्हावा अशी देवीच्या चरणी प्रार्थना केली... गरीब मजदूर शेतकरी सुखी व्हावे, जगात आपला देश विश्वगुरु आहे तसा आर्थिक दृष्ट्या व्हावा तिसरी महासत्ता व्हावे... बेरोजगारीपासून देशाला मुक्ती मिळावी... अशी प्रार्थना नितीन गडकरी यांनी देवीच्या चरणी केली...

  • 04 May 2024 11:12 AM (IST)

    Live Update | ऐन लोकसभा निवडणुकीत राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार

    महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघ 7 मे पासून राज्यातील सर्व विकास कामे थांबवणार... दोन दिवसात कंत्राटदारांचे बिल न दिल्यास काम बंद करण्याचा सरकारला इशारा... काल झालेल्या महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघ, राज्य अभियंता संघटनेच्या बैठकीत एकमताने ठराव संमत करण्यात आला.

  • 04 May 2024 10:48 AM (IST)

    सांगली - सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

    सांगलीच्या एरंडवलीमध्ये सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे लँडिंग करावं लागलं. एका शेतात सुरक्षितपणे ध्रुव हेलिकॉप्टरचं झालं लँडिंग.

  • 04 May 2024 10:16 AM (IST)

    मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

    मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. सराफाच्या मुलाला मारहाण करतानाचे फुटेज समोर आले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

  • 04 May 2024 10:08 AM (IST)

    मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र गुंडांना पक्षात प्रवेश देतात - संजय राऊत

    मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र गुंडांना पक्षात प्रवेश देतात. ठाणे, कल्याणमधील गुंड मिळून शिंदेंचा पक्ष तयार झाला आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 04 May 2024 09:57 AM (IST)

    रुग्णांना सलाईनमुळे उलट्या

    अमरावतीमधील तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णांना सलाईनमुळे उलट्याचा त्रास झाल्याच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक रुग्णांच्या उलट्या थांबत नसल्यामुळे नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

  • 04 May 2024 09:44 AM (IST)

    धाराशिवमध्ये 16 बालकांना ताप

    धाराशिव येथील वैद्यकीय रुग्णालयात 16 बालकांना ताप आल्यानंतर अँटीबायोटीक इंजेक्शन देण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अचानक थंडी जाणवू लागली. त्यामुळे या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली असून आरोग्य विभागाकडे अहवाल पाठवला आहे.

  • 04 May 2024 09:29 AM (IST)

    राज्यातील धरणात अवघा २९ टक्केच पाणीसाठा

    राज्यातील धरणात अवघा २९ टक्केच पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीने राज्यात चिंता वाढली आहे. नागपूर विभागात अवघा ४० टक्केच पाणीसाठा आहे. अमरावती विभागात ४४ टक्के तर मराठवाड्यात अवघा १३ टक्के पाणीसाठा आहे.

  • 04 May 2024 09:14 AM (IST)

    अहिल्याबाईंचे वंशज अजित पवार गटात

    आमदार रोहित पवार यांचे कट्टर समर्थक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांचा अजित पवार गटात प्रवेश झाला. राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवारांच्या उपस्थितीत कर्जत जामखेड मतदारसंघ त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

  • 04 May 2024 08:54 AM (IST)

    मोदींनी कुठे कुटुंब सांभाळलं - शरद पवार

    "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक आश्वासन कृतीत आणली नाहीत. मोदींविरोधात लोकांमध्ये नाराजी आहे. मोदींनी कुठे कुटुंब सांभाळलं" असं शरद पवार म्हणाले.

  • 04 May 2024 08:42 AM (IST)

    Maharashtra News : राज ठाकरेंकडून महायुतीच्या उमेदवारासाठी पहिली प्रचार सभा

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कोकणात येत आहेत. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ ते आज सभा घेणार आहेत. कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयासमोरच्या मैदानावर सभा आहे. राज ठाकरे यांच्याकडून महायुतीच्या उमेदवारासाठी घेतलेली ही पहिली प्रचार सभा ठरेल.

  • 04 May 2024 08:17 AM (IST)

    Maharashtra News : शॉक लागून 12 म्हशींचा मृत्यू

    अक्कलकोटमध्ये शॉर्टसर्किटमुळे शॉक लागून 12 म्हशी जागीच दगावल्या. अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे गावातील घटना. माजी सैनिक निंगप्पा बाके यांच्या शेतातील दुर्देवी घटना. शॉर्टसर्किट होऊन म्हशीच्या गोठ्याच्या लोखंडी अँगलमध्ये करंट उतरल्यामुळे घडली दुर्देवी घटना. शेतकरी बाके यांचे सुमारे 22 लाख रुपयांचे नुकसान झाले असून तालुका प्रशासनाकडून गोठ्याची पाहणी करण्यात आली.

  • 04 May 2024 08:15 AM (IST)

    Maharashtra News : कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय

    केंद्र सरकारची मोठी घोषणा. कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय. 40 टक्के निर्यात शुल्क लावून निर्यात करता येणार. गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्याबंदीमुळे शेतकरी होते नाराज.

  • 04 May 2024 01:00 AM (IST)

    बाळासाहेब थोरांताची सरकारवर टीका

    देशातील वातावरण बदललं आहे.. मुठभर श्रीमंत लोकांसाठी काम करणार हे सरकार आहे.. जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे या सरकारने दुर्लक्ष केलंय, अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

Published On - May 04,2024 8:14 AM

Follow us
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.