AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kerala Story 2 Box Office Collection Day 1: काही तासांत ‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमाने छापले इतके कोटी, जाणून व्हाल थक्क

The Kerala Story 2 Box Office Collection Day 1: फसवून लग्न, जबरदस्तीने धर्मांतर आणि... 'द केरळ स्टोरी 2' या वास्तववादी सिनेमा काही तासांत कमावले कोट्यवधी... आकडा जाणून व्हाल थक्क, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाची चर्चा...

The Kerala Story 2 Box Office Collection Day 1: काही तासांत 'द केरळ स्टोरी 2' सिनेमाने छापले इतके कोटी, जाणून व्हाल थक्क
The Kerala Story 2
| Updated on: Feb 28, 2026 | 10:38 AM
Share

The Kerala Story 2 Box Office Collection Day 1: वादग्रस्त सिनेमा ‘द केरल स्टोरी 2: गोस बियॉन्ड’ 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक वाद समोर आले, पण अखेर सिनेमा प्रदर्शित झालाच आणि पहिल्या दिवशी, ते देखील काही तासांत सिनेमाने किती कोटींचा गल्ला जमवला आहे… यासंबंधी माहिती देखील समोर आली आहे. सांगायचं झालं तर, 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा सिक्वल ‘द केरल स्टोरी 2: गोस बियॉन्ड’ सिनेमा आहे. ‘द केरळ स्टोरी 2’ ज्यावर न्यायालयाने त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती, त्या सिनेमावरील बंदी शुक्रवारी उठवण्यात आली. संध्याकाळी सिनेमा प्रदर्शित झाला, त्यामुळे निर्मात्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

रिपोर्टनुसार, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी जवळपास 1.6 ते 1.8 कोटी रुपयांचा कमाई केली. पण याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ही ओपनिंग ‘द केरळ स्टोरी’ सिनेमापेक्षा कमी आहे, जिथे पहिल्या सिनेमाने पहिल्या दिवशी सुमारे 6 – 8 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. त्यामुळे आता सिनेमा किती कोटींपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘द केरल स्टोरी 2: गोस बियॉन्ड’ सिनेमाच्या बजेटबद्दल सांगायचं झालं तर, 30 कोटी रुपयांत सिनेमा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिनेमाने चांगली कमगिरी केल्यास सिनेमा सेफ झोनमध्ये येऊ शकतो… केरळ स्टोरी 2 हा सिनेमा वादात सापडल्यामुळे बॉक्स ऑफिसवर त्याचा परिणाम दिसून आला. रिलीजच्या एक दिवस आधी, केरळ उच्च न्यायालयाने सीबीएफसीच्या प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्याच्या प्रदर्शनावर 15 दिवसांची स्थगिती आणली.

न्यायालयाने असा निर्णय दिला की, सिनेमा सार्वजनिक सुव्यवस्था आणि सांप्रदायिक सौहार्दाला धोका निर्माण करू शकतो. पण, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नंतर स्थगिती उठवली आणि सिनेमा प्रदर्शित करण्यास परवानगी दिली. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला. कारण सिनेमावर बंदी आली असती तर, निर्मात्यांना मोठा फटका बसला असता…

‘द केरल स्टोरी 2: गोस बियॉन्ड’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिति भाटिया यांल अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे. सिनेमाची कथा तीन मुलीच्या आयुष्याभोवती फिरताना दिसत आहे. ज्यामध्ये प्रेमाचं खोटं नाटक, फसवून लग्न आणि जबरदस्तीने धर्मांतर यांसरख्या मुद्द्यांना अधोरेखीत करण्यात आलं आहे. आता येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.