AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, CSK vs LSG: चेन्नई सुपर किंग्सचा विजय, लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट

आयपीएल 2026 स्पर्धेतील 53व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभवाची धूळ चारली. या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. तर लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट झाला आहे.

IPL 2026, CSK vs LSG: चेन्नई सुपर किंग्सचा विजय, लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट
चेन्नई सुपर किंग्सचा दणदणीत विजय, लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून आऊटImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 10, 2026 | 7:41 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 53व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा वरचष्मा दिसला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि चेन्नई सुपर किंग्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लखनौ सुपर जायंट्सने चांगली सुरूवात केली. मात्र त्यानंतर धडाधडा विकेट पडल्या आणि धावगतीला ब्रेक लागला. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 8 गडी गमवून 203 धावा केल्या आणि विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सने आक्रमक सुरूवात केली. उर्विल पटेलने तर लखनौच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने 23 चेंडूत 8 षटकार आणि 2 चौकार मारत 65 धावांची खेळी केली. या खेळीमुळे लखनौ सुपर जायंट्सच्या हातून सामना निघून गेला होता. त्यानंतर चेंडू आणि धावांमधील अंतर कमी झालं आणि हा सामना चेन्नई सुपर किंग्सने जिंकला. चेन्नई सुपर किंग्सने हा सामना 5 विकेट राखून जिंकला.

लखनौ सुपर जायंट्सचा डाव

लखनौ सुपर जायंट्सकडून जोश इंग्लिसने चांगली सुरूवात करून दिली. त्यान 33 चेंडूत 10 चौकार आमइ 6 षटकार मारत 85 धावांची खेळी केली. पण त्याला इतर खेळाडूंची हवी तशी साथ मिळाली नाही. मिचेल मार्श 10, निकोलस पूरन 1, ऋषभ पंत 15, एडन मार्करम 6, अक्षत रघुवंसी 18, हिम्मत सिंग 17 आणि मोहम्मद शमी 0 धावांवर बाद झाले. तर शाहबाज अहमदने 25 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार मारत नाबाद 43 धावांची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्सकडून जेमी ओव्हरटनने 4 षटकात 36 धावा देत 3 गडी बाद केले. तर अंशुल कंबोजने 2 आणि नूर अहमदने 1 गडी बाद केला.

चेन्नईची प्लेऑफच्या दिशेने कूच, लखनौचा पत्ता कट

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्सने प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे. चेन्नई सुपर किंग्सने 11 सामने खेळले असून त्यापैकी 6 सामन्यात विजय आणि पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. 12 गुणांसह चेन्नई सुपर किंग्सने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. आता तीन सामन्यांचा खेळ शिल्लक असून त्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवताच प्लेऑफचं गणित सुटणार आहे.

लखनौ सुपर जायंट्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. लखनौ सुपर जायंट्सने 11 पैकी 8 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर तीन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे 6 गुणांसह शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. इतकंच काय प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. कारण आता तीन सामन्यात विजय मिळवला तरी 12 गुण होतील. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता नाहीच. हैदराबाद आणि गुजरातचे 14 गुण आहेत. तर पंजाबच्या खात्यात 13 गुण आहेत. त्यामुळे ही तीन स्थान तर गेली. दुसरीकडे, आरसीबी, राजस्थान आणि चेन्नईच्या खात्यात 12 गुण आहेत.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...