AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग आता कोरोनापेक्षाही खरतनाक आजाराच्या विळख्यात, पुन्हा लॉकडाऊन लागणार? चिंता वाढली

जगात आता नव्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे, हा आजार कोरोनापेक्षाही खतरनाक मानला जात आहे, कारण या आजारावर अद्यापही कोणतीही विशिष्ट लस किंवा उपचार विकसीत झालेले नाहीयेत.

जग आता कोरोनापेक्षाही खरतनाक आजाराच्या विळख्यात, पुन्हा लॉकडाऊन लागणार? चिंता वाढली
Hanta virusImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 10, 2026 | 7:56 PM
Share

काही वर्षांपूर्वी कोरोनाने संपूर्ण जगभरात खळबळ उडून दिली होती. कोरोनाच्या लाटेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला. संपूर्ण जगभरात हाहाकरा उडाला होता. कोरोना काळात संपूर्ण जग ठप्प झालं होतं. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं होतं. या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. दरम्यान आता पुन्हा एकदा एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सध्या हंता व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात अर्जेंटीनामधून रवाना झालेल्या एका क्रूजवर पहिल्यांदा या आजाराचे रुग्ण आढळून आले होते. या क्रूजमधून 108 जण प्रवास करत होते, त्यातील 8 जणांना या आजाराची लागण झाली होती, त्यातील तिंघाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका डच कपलचा समावेश होता, तर एक प्रवासी हा जर्मनीचा नागरिक होता.

दरम्यान आता या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनुसार सध्या सधी घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाहीये. सध्या तरी या आजाराचा फार प्रादुर्भाव झालेला नाही. मात्र ध्रुवीय प्रदेश किंवा इतर देशांसाठी तुम्ही क्रूज बुक करत असाल तर काळजी घ्यावी असं आवाहान जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे.

आजारांपासून बचाव कसा करायचा?

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनुसार जर तुम्ही अशा देशांमध्ये फिरण्यासाठी जाणार असाल ज्या देशांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे, तर सध्या तरी अशा देशांमध्ये जाऊ नका. जर समजा तुम्ही अशा देशांना भेट दिलीच तर अशा भागांमध्ये जाणं टाळा ज्या प्रदेशामध्ये या आजाराचा धोका जास्त आहे. प्रवासादरम्यान स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

हंताचा प्रसार कसा होतो?

हंता व्हायरसचा प्रसार हा उंदराच्या मल-मुत्राद्वारे होते. गेल्यावर्षी याच आजारामुळे प्रसिद्ध अभिनेता जीन हॅकमॅन याच्या बायकोचं निधन झालं होतं. सध्या तरी या आजारावर कुठलीही लस किंवा उपचार उपलब्ध नाहीयेत, त्यावर तज्ज्ञांचं संशोधन सुरू आहे. अशी माहिती देखील या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!