AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, CSK vs LSG: चेन्नईविरुद्ध हातातला सामना गमावल्यानंतर ऋषभ पंत संतापला, सरळ म्हणाला की…

आयपीएल 2026 स्पर्धेतून लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 5 विकेट राखून लखनौ सुपर जायंट्सला पराभवाची धूळ चारली. खरं तर शेवटच्या टप्प्यात सामना लखनौच्या पारड्यात झुकला होता. पण काही चुका भोवल्या आणि हातातला सामना गमवावा लागला.

IPL 2026, CSK vs LSG: चेन्नईविरुद्ध हातातला सामना गमावल्यानंतर ऋषभ पंत संतापला, सरळ म्हणाला की...
IPL 2026, CSK vs LSG: चेन्नईविरुद्ध हातातला सामना गमावल्यानंतर ऋषभ पंत संतापला, सरळ म्हणाला की...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 10, 2026 | 8:18 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला 5 विकेट राखून पराभूत केलं. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमवून 203 धावा केल्या. तसेच विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं. या धावा चेन्नई सुपर किंग्सने शेवटच्या षटकात पहिल्या दोन चेंडूत पूर्ण केल्या. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सने पावरप्लेच्या दिशेने कूच केली आहे. तर लखनौ सुपर जायंट्सचं प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या उरल्यासुरल्या सर्व आशा संपुष्टात आल्या आहेत. आता तीन सामन्यात विजय मिळवला तरी 12 गुण होतील आणि 12 गुण आधीच टॉप 4 मधील संघांनी केल्या आहेत. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्ससाठी उर्वरित तीन सामने हे औपचारिक असणार आहेत. या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने संताप व्यक्त केला.

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, ‘मला वाटतं तो एक उत्तम सामना होता. सर्व काही छान जुळून येत होतं. आम्हाला माहित होतं की आम्ही पावर प्लेमध्ये पुरेसा दबाव टाकणार आहोत, कारण जेव्हा तुम्ही तसा सराव करता, तेव्हा तुम्ही अशाच प्रकारच्या क्रिकेटची अपेक्षा करता. पण त्याच वेळी, मला वाटतं की पुरेसा वेळ होता. टी20 क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा उच्च असायलाच हवा. खूप झेल सोडले गेले आणि जसं तुम्ही म्हणालात, पण याला फक्त एकाच गोष्टीला दोष देणं कठीण आहे. पण तिथून पुनरागमन करण्यासाठी दाखवलेला उर्विलने कणखरपणा खरोखरच चांगला होता. फक्त हीच एक गोष्ट आहे. उर्विलने आमच्यासाठी इंग्लिससारखीच एक शानदार, अविश्वसनीय खेळी केली. आम्हाला माहित होतं की पावर प्लेमध्ये कोणालातरी ती जबाबदारी घ्यावी लागेल आणि इंग्लिसने आमच्यासाठी तेच केलं. आणि सीएसकेसाठी, तो उर्विल होता. ‘

ऋषभ पंत पुढे म्हणाला की, ‘आम्हाला माहित होते की 200 च्या आसपास, 210 हे एक चांगले लक्ष्य असेल. त्यांनी पावर प्लेमध्ये धडाकेबाज सुरुवात केली. पण त्याच वेळी, आम्हाला हेही माहित होते की खेळ कठीण होत चालला होता आणि पॉवर प्लेनंतर चेंडू जुना होत होता, त्यामुळे खेळपट्टीवर फलंदाजी करणे थोडे अवघड जात होते. शेवटच्या षटकात शहबाजला खेळवण्याचा विचार माझ्या मनात आला, पण दोन डावखुरे फलंदाज फलंदाजी करत असताना, तो एक अवघड निर्णय होता. तुम्हाला अशा खेळाडूला पाठिंबा द्यावाच लागतो जो आमच्यावर मात करू शकेल आणि पुन्हा, गेल्या काही वर्षांत मार्करामने आमच्यासाठी अनेकदा असेच केले आहे.’

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...