AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवलीत शिवसेनेची विश्वविक्रम तिरंगा रॅली; भाजप नेत्यांची पाठ, महायुतीत पुन्हा ‘धुसफूस’?

डोंबिवली शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. डोंबिवलीत शिवसेनेने विश्वविक्रमी तिरंगा रॅली काढली असून या रॅलीपासून स्थानिक भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी अंतर राखले होते.

डोंबिवलीत शिवसेनेची विश्वविक्रम तिरंगा रॅली; भाजप नेत्यांची पाठ, महायुतीत पुन्हा ‘धुसफूस’?
Dombivli World-Record-Breaking Tricolour Rally
| Updated on: Aug 15, 2026 | 3:57 PM
Share

डोंबिवली शहरात यंदाचा स्वातंत्र्य दिन विशेष पद्धतीने साजरा झाला. डोंबिवलीत यंदा विश्व विक्रमी तिरंगा रॅलीत तब्बल ३५ हजार चौरस फुटांचा तिरंगा फडकवण्यात आला. तसेच २१०० मीटर लांबीचा आणि ५ फूट रुंदीचा तिरंगा घेऊन हजारो विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरले.या रॅलीत देशभक्तीचा जल्लोष साजरा करण्यात आला. डोंबिवलीतील या तिरंगा रॅलरीचा Asia Book of Records आणि India Book of Records मध्ये अधिकृत नोंद झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ आवाहनाला प्रतिसाद देत श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि विविध संस्थांच्या पुढाकाराने ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र, भाजपाने या रॅलीत सहभाग न घेता स्वतंत्र रॅली काढल्याने महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

डोंबिवली शहरात आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत ३५ हजार चौरस फुटाचा भव्य तिरंगा फडकवण्यात आला.या रॅलीत २१०० मीटर लांब आणि ५ फूट रुंद तिरंगा घेऊन हजारो विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरले, त्यावेळी देशभक्तीचा जल्लोष साजरा झाला. या रॅलीतील तिरंगा फडकवण्याच्या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे डोंबिवलीच्या शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ आवाहनाला प्रतिसाद देत श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि विविध संस्थांचा पुढाकाराने ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र, शिवसेनेच्या या विश्वविक्रमी तिरंगा रॅलीत भाजपचे स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते अनुपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे महायुतीतील शिवसेना आणि भाजपात पुन्हा धुसफूस सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

या संदर्भात विचारले असता शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम म्हणाले की‘हा पक्षाचा कार्यक्रम नव्हता, डोंबिवलीकरांचा मान-सन्मान होता. कोण आले-कोण नाही याकडे लक्ष नव्हते. दरम्यान, भाजपाने टिटवाळा ते अंबरनाथ स्वतंत्र बाईक रॅली काढली होती. भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा या बाईक रॅलीत सहभाग घेतला होता. विश्वविक्रमासाठी मित्रपक्ष शिवसेनेला मनापासून शुभेच्छा अशा शब्दात भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सहकारी पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?