AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FSR ग्लोबलच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्वेता रवी कुमार यांची एनर्जी इन्स्टिट्यूटच्या फेलो म्हणून निवड

Swetha Ravi Kumar : श्वेता रवी कुमार, ज्या FSR Global च्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत, त्यांची प्रतिष्ठित एनर्जी इन्स्टिट्यूटच्या फेलो म्हणून ‘Eminence Route’ अंतर्गत निवड करण्यात आली आहे.

FSR ग्लोबलच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्वेता रवी कुमार यांची एनर्जी इन्स्टिट्यूटच्या फेलो म्हणून निवड
Swetha Ravi KumarImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 10, 2026 | 8:19 PM
Share

हैदराबादच्या श्वेता रवी कुमार, ज्या FSR Global च्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असून भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या इंडिया एनर्जी स्टॅक (IES) या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पाच्या प्रोग्राम डायरेक्टर आणि राष्ट्रीय टास्क फोर्सच्या सदस्य आहेत, त्यांची प्रतिष्ठित एनर्जी इन्स्टिट्यूटच्या फेलो म्हणून ‘Eminence Route’ अंतर्गत निवड करण्यात आली आहे.

श्वेता रवी कुमार यांनी लिंक्डइनवरील पोस्टमध्ये लिहिले, ‘मला अत्यंत आनंद होत आहे की माझी एनर्जी इन्स्टिट्यूटच्या Fellow म्हणून Eminence Route अंतर्गत निवड झाली आहे. ही जबाबदारी मी केवळ वैयक्तिक सन्मान म्हणून पाहत नाही, तर ऊर्जा क्षेत्रात सुरू असलेल्या डिजिटलायझेशन, डी-सेंट्रलायझेशन, लवचिकता, AI आणि नवीन पायाभूत नियोजनाच्या बदलांच्या काळात जागतिक ऊर्जा चर्चेत अधिक सक्रिय योगदान देण्याची जबाबदारी म्हणून पाहते.”

श्वेता यांनी पुढे सांगितले की, FSR ग्लोबलचे बहुतांश काम हे सुधारणा प्रक्रियेच्या व्यावहारिक रचनेवर आधारित आहे. यामध्ये प्रशासन व्यवस्था, बाजार रचना, डेटा सिस्टिम, इंटरऑपरेबिलिटी, क्षमता विकास आणि प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्ट पायलट्स यांचा समावेश आहे. FSR ग्लोबलचे मुख्य लक्ष ग्लोबल साऊथमधील ऊर्जा संक्रमणासाठी प्रभावी आणि अमलात आणता येणारे नियमन तयार करण्यावर आहे.

आपल्या पोस्टमध्ये त्या पुढे म्हणाल्या, ‘ऊर्जा संक्रमणाचा पुढचा टप्पा केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही. वीज, गॅस, उष्णता, वाहतूक, डिजिटल पायाभूत सुविधा, ग्राहक आणि बाजार हे सर्व आता परस्परांशी जोडले जात आहेत. त्यामुळे नियामक संस्थांनाही ही बदलती वास्तवता स्वीकारावी लागेल.’

FSR ग्लोबलची सुरुवात इटलीतील फ्लॉरेन्स स्कूल ऑफ रेग्युलेशनची ‘सिस्टर संस्था’ म्हणून झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘आत्मनिर्भरता’च्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सल्लागार आणि धोरण क्षेत्रात स्वदेशी क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही संस्था उभारण्यात आली होती. पुढे FSR ग्लोबल ही ग्लोबल साऊथवर लक्ष केंद्रित करणारी भारत-आधारित स्वतंत्र पॉलिसी थिंक-टँक म्हणून विकसित झाली असून ऊर्जा क्षेत्रातील धोरण आणि नियमन यामध्ये विशेष काम करत आहे.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?