AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहिणीने भावाच्या घरी जास्त थांबायचं नसतंय, या ओबीसी नेत्याचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष बारामती मतदार संघाकडे लागलं आहे. बारामतीत यंदा पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार असा सामना रंगलेला असतानाच आता या ओबीसी नेत्याच्या या खास वक्तव्याने फोडणी बसली आहे.

बहिणीने भावाच्या घरी जास्त थांबायचं नसतंय, या ओबीसी नेत्याचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
बहिणीने भावाच्या घरी जास्त थांबायचं नसतं, सुप्रिया सुळेंना सल्ला
| Updated on: May 04, 2024 | 11:40 AM
Share

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष बारामतीकडे लागले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात यंदा पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना होत आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात खासदारकीसाठी थेट लढत आहे. दोन्ही बाजूंनी जागा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचवेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

जानकरांनी असा साधला निशाणा

सुप्रिया ताईंना मी सांगेन बहिणीने भावाच्या घरी जास्त दिवस नाही राहिलं पाहिजे. बहिणीने तीच्या घरी जावं, देशाच एनडीएचं सरकार बनत आहे, बारामतीचा खासदार हा सरकारला समर्थन करणारा बनावा म्हणून सांगायला आलोय असा टोला जानकरांनी हाणला. त्याच्या या विधानाची जोरदार चर्चा आहे. जानकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान महायुतीत यशस्वी मध्यस्थी झाल्याने परभणीची जागा रासपसाठी सोडण्यात आली. जानकर आता परभणीतून लोकसभेसाठी नशीब आजमावत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष महादेव जानकर बारामती दौऱ्यावर आले आहेत.

धनगर आरक्षणावर भूमिका

मी मंत्री होतो तेंव्हा 22 योजना धनगर समाजासाठी सुरू केल्या होत्या. काँग्रेस सरकारने अश्या योजना कधी लागू केल्या, अस सवाल त्यांनी विचारला. उद्या केंद्रात मी खासदार होणार आहे, आदिसांच्या 22 योजना धनगर समाजाला द्याव्या ही मी मागणी मोदींना करणार असे ते म्हणाले. शाहू, फुले, आंबेडकर म्हणता आणि धनगर समाजाला व्हॉईस चेअरमन करता. ओबीसींना घटनात्मक दर्जा देण्याच काम मोदी सरकारने केलं. धनगर समाजासाठी आम्ही सक्षम आहोत, आम्ही त्या क्याडरचे लिडर आहोत, असे ते म्हणाले.

ओबीसी समाज अजितदादांच्या पाठिशी

संविधान हे कोणी बदलू शकत नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.. तसेच उत्तम जानकर हे आमदारकीच्या उमेदवारीसाठी जात बदलत आहेत. त्यामुळे अशा लोकांवर मी बोलणे पसंत करत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आपल्यावर प्रेम करणारा ओबीसी समाज अजितदादांच्या पाठिशी असल्याचा दावा त्यांनी केला.

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.