AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर धक्कादायक माहिती, थेट देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळांचा त्या विमान कंपनीच्या विमानाने…

अजित पवार यांच्या विमान अपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. यादरम्यान अजित पवार ज्या विमान कंपनीने प्रवास करत होते, त्या विमान कंपनीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आली. आता धक्कादायक अशी माहिती VSR कंपनीच्या विमानांबद्दल पुढे येत आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर धक्कादायक माहिती, थेट देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळांचा त्या विमान कंपनीच्या विमानाने...
VSR Company flight travel
| Updated on: Feb 28, 2026 | 9:07 AM
Share

राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारातमीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. 8.10 ला अजित पवार VSR कंपनीच्या विमानात बसले आणि 8.45 ला त्यांचे विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या अगदी जवळ पोहोचले असता त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. या विमान अपघाताचे काही सीसीटीव्ही पुढे आले असून विमान जमिनीवर नक्की कसे कोसळले हे स्पष्ट दिसत आहे. विमानतळाच्या बाजूला असलेल्या एका शेतात विमान कोसळले आणि मोठे चार ते पाच स्फोट झाले. अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळताच लोकांनी थेट बारामतीकडे धाव घेतली. अजित पवार यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली. अजित पवार आपल्यात नाहीत, यावर लोकांना आजही विश्वास बसत नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यासोबतच पक्षाची सर्व जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी आपल्याच खांद्यावर घेतली. मात्र, यादरम्यान पवार कुटुंबातील वादही पुढे येताना दिसतोय.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर VSR कंपनीवर गंभीर आरोप केली जात आहेत. यासोबतच VSR कंपनीवर कारवाईही करण्यात आली. त्यांच्या विमात काह त्रूटी असल्याचे अहवालात पुढे आले. मात्र, VSR कंपनीच्या विरोधात रोहित पवार आक्रमक भूमिका घेत असतानाच आता धक्कादायक माहिती पुढे आली. पुन्हा सरकारकडून VSR कंपनीचे विमान वापरण्यात आले.

चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ यांनी नुकताच VSR कंपनीच्या विमानाने प्रवास केल्याची माहती पुढे आली. VSR कंपनीच्या विमानाने नाशिक मुंबई असा प्रवास फडणवीस, सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री छगन भुजबळ VSR कंपनीच्या विमानातून नाशिक ते मुंबई असा प्रवास केला.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर VSR कंपनीच्या सुरक्षेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केली जात आहेत. यादरम्यानच आता हा प्रवास करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच मोठा निर्णय घेत आपल्या पक्षातील नेत्यांना सूचना करत VSR कंपनीच्या विमानाने प्रवास करणे टाळा, अशा सूचना दिल्या आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...