AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गेला… देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान, म्हणाले…

राज्यात आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. यावेळी अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणीला उजाळा देताना देवेंद्र फडणवीस दिसले.

दादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गेला... देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान, म्हणाले...
Devendra Fadnavis
| Updated on: Feb 23, 2026 | 1:19 PM
Share

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशात अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, कधीही असा विचार केला नाही की, अशाप्रकारचा प्रस्ताव मला मांडावा लागेल. मी माझा जवळचा एक मित्र गमावला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी 27 जानेवीरी 2026 रोजी अजित पवार यांच्यासोबतच्या बैठक काय घडले आणि ती शेवटची दादांसोबत भेट होती, याची किंचतही कल्पना नव्हती. दादा कधीही वेळ चुकवणारे नव्हते. मात्र, अपघाताच्या दिवशी त्यांची वेळ चूकली. अजित पवार शब्दाला जागणारा माणूस होता. दादांना सामान्य माणसांच्या अडचणी माहिती होत्या. अजित पवार यांच्यात मुख्यमंत्रिपदाची क्षमता होती, असेही मोठे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. अजित पवार सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न होते.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. दादा नेहमीच म्हणायचे की, मी कधीतरी मुख्यमंत्री होईल. पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहिल. मी आज हे म्हणून शकतो की, अजितदादा पवार हे सर्वोत्तम मुख्यमंत्री झाले असते. एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो आज अजित पवारांच्या रूपाने आपल्यात नाही. कधीतरी नियतीने त्यांचे ते स्वप्नही पूर्ण केले असते.

शेवटी राजकारणात वेगवेगळ्या प्रकारचे गणिते असतात. पण क्षमतेचा विचार केला असता मुख्यमंत्री पदाकरिता पूर्णपणे क्षमता असलेले नेतृत्व अजित पवारांचे होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. दु:ख बाजूला सारून सुनेत्रा वहिणी कामाला लागल्या. विकासप्रकल्पांच्या बाबतीत अजित पवार कायमच सकारात्मक असायचे. अजित पवार यांच्यासोबत अनेक गोष्टींवर चर्चा व्हायच्या. अजित पवार यांना दूध प्यायला आवडायचे. आमचे हेलिकॉप्टर असो किंवा विमान त्यामध्ये कायम दूध असायचे. कोल्ड ड्रिंक वगैरे ते पित नव्हते कोल्ड मिल्क ते पित.

अजितदादा 12 चा कार्यक्रम असेल तर अजितदादा 11.59 ला बैठकीला असायचे. मंत्रालयातील बैठकीला अजित पवार अधिकाऱ्यांपेक्षा लवकर पोहोचत. म्हणून कमीही काम थांबले आहे किंवा दादा नसल्याने फाईल पुढे गेली नाही, असे कधीही घडले नाही. मंत्रीमंडळात कितीही विषय असले तरीही ते अभ्यास करून यायचे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा