AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Death : नेहमीचा तो भारदस्त आवाज ऐकू आला नाही.. खूप वेदनादायी..! अजित दादांच्या आठवणीत रोहित पवारांचा इमोशनल मेसेज, जय पवारही भावूक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. महाराष्ट्र अजूनही शोकाकुल असून पवार कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवारांनी भावनिक पोस्ट करत अपघाताच्या तपासाचे संकेत दिले. जय पवारांनीही वडिलांची आठवण काढली. दरम्यान, या अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल आज येणार असून पुढील खुलाशांकडे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar Death : नेहमीचा तो भारदस्त आवाज ऐकू आला नाही.. खूप वेदनादायी..! अजित दादांच्या आठवणीत रोहित पवारांचा इमोशनल मेसेज, जय पवारही भावूक
अजित पवारांच्या आठवणीत पुतण्या, लेक भावूक
| Updated on: Feb 28, 2026 | 9:47 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्मयंत्री अजित पवार यांच्या निधनाला आ एक महीना पूर्ण झाला आहे. आजपासून बरोब्बर 1 महीना आधी, 28 जानेवारी रोजी, बारामतीजवळ अजित पवार यांचं विनमान लँडिंग दरम्यान क्रॅश झालं. त्यानंतर मोठ्ठे स्फोट होऊन आग लागली आणि यामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एवढंच नव्हे तर त्यांच्यासह आणखी चौघांचाही जीव गेला. अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव, पायलट कपूर, को पायलट शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माली या चौघांनीही अपघातात जीव गमावला. या घटनेने अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. पवार कुटुंब, बारामतीकरांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला. काही सभांसाठी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामतीला जात होते, मात्र तेथे उतरण्यापूर्वीच विमान खाली कोसळलं आणि ही दुर्दैवी घटना घडली.

या अपघाताला आज एक महीना पूर्ण झाल असून अजित दादांच्या जाण्याचा धक्का कोणीही अजून पचवू शकलेलं नाही. अजित पवारांचे पुतणे रोहित पवार हेही अतिय भावूक झाले असून त्यांन त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक इमोशनल मेसेज लिहीला आहे.

रोहित पवारांचं ट्विट काय ?

X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाऊंटवर रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. ‘ जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं, असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही..😭खूप वेदनादायी..!’ असं रोहित पवारांनी लिहीत अजित दादांची आठवण काढली आहे. काकांच्या जाण्याने रोहित पवार अतिशय दु:खी असून अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात या विषयाचा ते कसून तपास करत आहेत.

वडिलांच्या आठवणीत जय पवारही भावूक

दुसरीकडे अजित पवार यांच्या आठवणीत त्यांचे पुत जय पवार हेही भावूक झालेले दिसले. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. Miss You Dad एवढंच त्यांनी त्यासोबत लिहीलं असून वडिलांच्य जाण्याने ते व्याकूळ झाल्याचं पोस्टवरून दिसत आहे. यापूर्वी जय पवार यांनी अजित दादांसोबतचे काही फोटो शेअर केले होते. आज अजित दादांच्या मृत्यूला एक महीना पूर्ण झाल्यालवर त्यांनी पुन्हा वडिलांची आठवण शेअर केली आहे.

 दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल – सुप्रिया सुळेंचीही पोस्ट

अजित पवार यांच्या जाण्याने सुप्रिया सुळेही खूप भावूक झाल्या होत्या. अजित पवारांना जाऊन 1 महिना झाल्यानंतर आज सुप्रिया सुळे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.  ‘ आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचविणे अजूनही कठिण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील. Miss you Dada’ असं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

विमान अपघाताच्या प्राथमिक तपासाचा अहवाल येणार आज

दरम्यान अजित पवार यांचा विमान अपघातासंबधी करण्यात आलेल्या तपासाचा प्राथमिक अहवाल आज येणार आहे. अपघाताच नेमकं कारण काय ते यातून समोर येऊ शकतं, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याकडे लागलं आहे. तर 2 मार्च रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार, रोहित पवार हे याप्रकरणी नवीन खुलासे करणार आहेत. तसेच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार आहेत. काच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी दीर्घ चर्चाही केली होती.

Follow Us
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल