भाजपची उचलेगिरी, प्रत्युत्तरासाठी राज ठाकरेंनी काढलेलंच व्यंगचित्र वापरलं!

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘सक्रांत’ स्पेशल व्यंगचित्र काढून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर आपल्या कुंचल्यातून फटकारे ओढले आहेत. राज ठाकरेंनी काढलेले हे व्यंगचित्र भाजपच्या इतक्या जिव्हारी लागलं की, त्यांनी लगेच प्रत्युत्तरासाठी दुसरे व्यंगचित्र प्रसिद्ध केले. मात्र, भाजपने राज ठाकरेंनी रेखाटलेले व्यंगचित्रच वापरले असून, केवळ त्यातील […]

भाजपची उचलेगिरी, प्रत्युत्तरासाठी राज ठाकरेंनी काढलेलंच व्यंगचित्र वापरलं!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘सक्रांत’ स्पेशल व्यंगचित्र काढून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर आपल्या कुंचल्यातून फटकारे ओढले आहेत. राज ठाकरेंनी काढलेले हे व्यंगचित्र भाजपच्या इतक्या जिव्हारी लागलं की, त्यांनी लगेच प्रत्युत्तरासाठी दुसरे व्यंगचित्र प्रसिद्ध केले. मात्र, भाजपने राज ठाकरेंनी रेखाटलेले व्यंगचित्रच वापरले असून, केवळ त्यातील कॅरेक्टर्सचे चेहरे बदलून, त्यांच्या तोंडी असलेले वाक्य बदलून प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे भाजपची उचलेगिरी उघड झाली आहे.

राज ठाकरेंच्या मूळ व्यंगचित्रात काय होतं?

‘सक्रांत’ असा मथळा देऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज फेसबुक-ट्विटरवरुन एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पतंग उडवताना दिसत असून, पतंगावर ‘नव्या थापा, 10 टक्के आरक्षण, इतर’ असे लिहिलेले आहे. तसेच, इतर पतंग खाली अस्ताव्यस्त पडलेले दाखवले असून, त्या पतंगांवर नोटाबंदी, स्वच्छ भारत, जीएसटी, मेक इन इंडिया, काळा पैसा इत्यादी गोष्टी लिहिल्या आहेत.

मोदींच्या बाजूला अमित शाह, भक्त, काही मीडिया आणि भाजप दाखवण्यात आले आहे. हे सगळे मांजा पकडण्याचा केवळ अभिनय करताना दिसत असून, भाजप नामक व्यक्ती मोदींकडे पाठ करुन उभी आहे. हे सर्वजण ‘उडवा’ असे मोदींना सांगत आहेत. या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदी-शाह जोडगोळीवर निशाणा साधला आहे.

प्रत्युत्तरासाठी भाजपचं व्यंगचित्र

राज ठाकरेंचं हे व्यंगचित्र भाजपच्या जिव्हारी लागल्याने, भाजपने ‘महाराष्ट्र बीजेपी’च्या ट्विटर हँडलवरुन एक व्यंगचित्र शेअर केले आहे. मात्र, भाजपने शेअर केलेले व्यंगचित्र राज ठाकरेंचे व्यंगचित्र चोरुन त्यातच एडिट केल्याचे दिसते आहे.

भाजपने राज ठाकरेंच्या हातात पतंगाची दोरी दाखवली असून, शरद पवारांच्या हातात मांजा दाखवला आहे. आजूबाजूला नमो रुग्ण, काही मीडिया, मराठी माणूस दाखवण्यात आला आहे. राज ठाकरे उडवत असलेल्या पतंगावर ‘राज : एक कटी पतंग, सर्व मुद्दे वापरुन झाले’ असे लिहिले आहे. शिवाय, खाली पडलेल्या इतर पतंगांवर बारामतीची पोपटपंची, बाळासाहेबांचा सूप, राजला साथ द्या, टोलचा झोल इत्यादी गोष्टी लिहिल्या आहेत.

भाजपने राज ठाकरेंच्या मूळ व्यंगचित्रात नेमके बदल केले असले, तरी राज ठाकरेंचं व्यंगचित्र चोरल्याने त्यांची उचलेगिरी मात्र उघड झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता पुन्हा भाजपची टर उडवली जात आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.