खूप दिवसांनी राज ठाकरेंचं ‘मोदी-शाह’ सोडून व्यंगचित्र

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या कुंचल्यातून सत्ताधाऱ्यांवर अनेक फटकारे ओढले. ‘मोदी-शाह’ जोडगोळी तर कायमच त्यांच्या निशाण्यावर असत. मात्र, आज खूप दिवसांनी राज ठाकरेंनी मोदी-शाह जोडगोळी सोडून इतर विषयावर व्यंगचित्र रेखाटले आहे. व्यंगचित्र नेमकं काय आहे? टेंभू (कराड) येथे आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. या घटनेच्या अनुशंघाने राज ठाकरे […]

खूप दिवसांनी राज ठाकरेंचं 'मोदी-शाह' सोडून व्यंगचित्र
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या कुंचल्यातून सत्ताधाऱ्यांवर अनेक फटकारे ओढले. ‘मोदी-शाह’ जोडगोळी तर कायमच त्यांच्या निशाण्यावर असत. मात्र, आज खूप दिवसांनी राज ठाकरेंनी मोदी-शाह जोडगोळी सोडून इतर विषयावर व्यंगचित्र रेखाटले आहे.

व्यंगचित्र नेमकं काय आहे?

टेंभू (कराड) येथे आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. या घटनेच्या अनुशंघाने राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे. यात लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर दाखवले आहेत. त्यांच्या आजूबाजूला समस्या दाखवल्या आहेत. महिलावंरील अत्याचार, जातीय संघर्ष, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या इत्यादी गोष्टी दाखवल्या आहेत.

त्याचवेळी, लोकमान्य टिळके हे आगरकरांना उद्देशून म्हणतात, “गोपाळराव, आजची परिस्थिती पाहता आपण जे बोलत होतात, ते पटायला लागलंय!” आगरकरांनी आधी स्वातंत्र्य की आधी समाजसुधारणा, या वादात आधी समाजसुधारणेचा मुद्दा मांडला होता. त्याचा संदर्भ राज ठाकरेंनी इथे दिला आहे.

राज ठाकरे यांचे अनेक व्यंगचित्र हे सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढण्याचे काम करतात. गेल्या काही महिन्यांमध्ये तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादी नेते राज ठाकरेंच्या निशाण्यावरच होते.

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.