AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 4 May 2024 : सोने-चांदीचा डाबडुबलीचा खेळ; दरवाढीनंतर झाला गेम, आता किंमती पुन्हा झाल्या कमी

Gold Silver Rate Today 4 May 2024 : या आठवड्यात आणि मे महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीचा डाबडुबलीचा खेळ दिसून आला. दिवसातून पण चढउतार दिसून आला. तसा ग्राहकांना या आठवड्यात दिलासा मिळाला. सोने दणकावून आपटले तसे दरही वाढले. मार्च-एप्रिलचा विचार करता या आठवड्यात दिलासा मिळाला.

Gold Silver Rate Today 4 May 2024 : सोने-चांदीचा डाबडुबलीचा खेळ; दरवाढीनंतर झाला गेम, आता किंमती पुन्हा झाल्या कमी
सोने आणि चांदीची स्वस्ताई, इतके कमी झाले भावImage Credit source: गुगल
| Updated on: May 04, 2024 | 8:39 AM
Share

सोने आणि चांदीने या आठवड्यात आणि मे महिन्याच्या सुरुवातीला ग्राहकांना मोठा दिलासा दिला. मार्च आणि एप्रिल महिन्यातील मौल्यवान धातूच्या भरारीने खरेदीदारांचे डोळे पांढरे झाले होते. ग्राहकांना या काळात मोठा फटका बसला. गुडरिटर्न्सनुसार, 1 मार्च 2024 रोजी 22 कॅरेट सोने 57,740 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,980 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तो आता थेट 22 कॅरेट सोने 65,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. बेशकिंमती धातूने दोन महिन्यातच जवळपास 8 हजार रुपयांचा दरवाढीचा टप्पा गाठला. काय आहेत सोने-चांदीची किंमत (Gold Silver Price Today 4 May 2024 )

सोने फिरले माघारी

या आठवड्याच्या सुरुवातीला 29 एप्रिल रोजी सोने 300 रुपयांनी उतरले. 30 एप्रिलला त्यात बदल झाला नाही.1 मे रोजी सोने 1,000 रुपयांनी स्वस्त झाले.2 मे रोजी सोने 700 रुपयांनी महागले. तर 3 मे रोजी 500 रुपयांनी पु्न्हा भाव उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी जैसे थे

17 एप्रिलपासून चांदीत सलग उसळी दिसली नाही. चांदी नरमली आहे. 29 एप्रिल रोजी किंमत कायम आहे. 30 एप्रिलला चांदी 500 रुपयांनी कमी झाली. 1 मे रोजी किंमती स्थिर होत्या. 2 मे रोजी भाव 500 रुपयांनी वाढले. त्यानंतर भावात बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. असोसिएशनने अजून किंमती अपडेट केलेल्या नव्हत्या. 24 कॅरेट सोने 71,191 रुपये, 23 कॅरेट 70,906 रुपये, 22 कॅरेट सोने 65,211 रुपये झाले. 18 कॅरेट 53,393 रुपये, 14 कॅरेट सोने 41,647 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 79,989 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा