शीना बोरा हत्या प्रकरण : राकेश मारियांच्या पुस्तकात गौप्यस्फोट, देवेन भारतींचं उत्तर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी 'लेटी मी से इट आय नो' असं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी शीना बोना हत्याकांड प्रकरणी तत्त्कालीन सहआयुक्त देवेन भारती यांनी आरोपींची माहिती दडवल्याचा दावा केला आहे. त्यांच्या दाव्याला देवेन भारती यांनी प्रत्युत्तर दिलं आहे (Sheena Bora murder case).

शीना बोरा हत्या प्रकरण : राकेश मारियांच्या पुस्तकात गौप्यस्फोट, देवेन भारतींचं उत्तर
Follow us
| Updated on: Feb 18, 2020 | 3:55 PM

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तत्कालीन पोलीस सहआयुक्त देवेन भारती यांनी शीना बोरा हत्याकांड प्ररकरणाशी संबंधित आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्याबाबत महत्त्वाची माहिती दडवली होती आणि हे क्लेशकारक होतं, असा दावा मारिया यांनी ‘लेटी मी से इट आय नो’ (Let Me Say It Now) या पुस्तकात केला आहे (Sheena Bora murder case). मारिया यांच्या या दाव्यावर एटीएसप्रमुख देवेन भारती यांनीदेखील प्रत्युत्तर दिलं आहे.

राकेश मारिया यांनी नेमका काय दावा केला?

शीना बोरा हत्याकांडाच्या तपासादरम्यान मुंबईचे तत्त्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. या बदलीवर राकेश मारिया यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता त्यांनी याप्रकरणावर आपलं मौन सोडलं आहे. त्यांनी ‘लेटी मी से इट आय नो’ (Let Me Say It Now) असं पुस्तक लिहिलं आहे (Sheena Bora murder case). या पुस्तकात त्यांनी शीना बोना हत्याकांड प्रकरणी तत्त्कालीन सहआयुक्त देवेन भारती यांनी आरोपींची माहिती दडवल्याचा दावा केला आहे. त्यांच्या दाव्याला देवेन भारती यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेन भारती यांचा पलटवार

“पुस्तकाला चांगली मार्केटिंग मिळावी यासाठी राकेश मारिया प्रयत्न करत असतील. ते एक पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी एका चार्जशीटवर आणि मिळालेल्या डायरीवर विश्वास ठेवायला हवा. त्यांनी फक्त एका स्टोरीवर विश्वास ठेवायला नको होता. मी यावर जास्त बोलू इच्छित नाही कारण या प्रकरणावर कोर्टात खटला सुरु आहे. शीना बोरा प्रकरणी सर्व माहिती तत्कालीन अधिकाऱ्यांना होती”, असं स्पष्टीकरण देवेन भारती यांनी दिलं.

“राकेश मारिया यांचं कुटुंब हे बॉलिवूडशी संबंधित आहे. त्यामुळे स्क्रिप्ट रायटिंगचा त्यांच्यावर प्रभाव आहे. हे सगळं प्रकरण म्हणजे पुस्तकाची विक्री आणि येत्या काळात वेब सिरीज बनवण्यासाठी तयार केलेला कंटेंट आहे. पण एका पोलीस दलातील व्यक्ती म्हणून चार्जशीट आणि रेकॉर्डवर असलेल्या गोष्टींवर मी विश्वास ठेवतो. या प्रकरणात तपास करणाऱ्या संपूर्ण टीमला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. कोणतीही गोष्टी लपवण्यात आलेली नाही. या संदर्भातले जे पेपर्स आहेत ते पडताळून पाहिल्यास सत्य आहे ते समोर दिसेल”, असं देवेन भारती यांनी स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.